सोने– चांदीत चढउतार; सुवर्णबाजारात आज आहेत इतके दर

सोने– चांदीत चढउतार; सुवर्णबाजारात आज आहेत इतके दर
सोने– चांदीत चढउतार; सुवर्णबाजारात आज आहेत इतके दर
Gold

जळगाव : जळगाव सुवर्णबाजारात गेल्या दिवसांपासून सोने व चांदीच्या किंमतीत चढउतार दिसून आले. सोन्याचे दर स्थिर ठेवल्यानंतर आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. तसेच चांदीच्या भावात देखील घसरण झाली आहे. आज सोने प्रति १० ग्रॅम ४८,३०० रुपये इतका आहे; तर चांदीच्या भावात घसरण होवून आज एक किलो चांदीसाठी ६७ हजार रुपयांवर आले आहेत. (jalgaon-news-Gold-silver-price-fluctuations-There-are-so-many-prices-in-the-gold-market-today)

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर सातत्‍याने होत असलेल्‍या चढउताराचा परिणाम सुवर्णबाजारावर होत आहे. सुवर्ण बाजारात सोने, चांदीच्या दरातील चढउतार अजूनही सुरूच आहे. सुवर्णबाजारपेठेत आलेली अस्थिरता यामुळे सोने व चांदीच्‍या दरात सातत्‍याने चढउतार होत आहे.

सोने घसरणीनंतर वाढ

सोन्याच्या किंमतीचा विचार केला असता १६ जुलैला १३० रुपये, १७ जुलैला १५० रुपये, १८ जुलैला १० रुपये तर मंगळवारी १५० रुपयांची घसरण झाली. सलग चार दिवस सुरु असलेल्या या किरकोळ घसरणीनंतर सोन्याच्या दरात आज २६० रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये सोन्याच्या दरात सातत्‍याने घसरण झाल्याचे पहायला मिळत होती. पण येत्या काही दिवसात सोन्याची किंमत वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अकरा महिन्‍यात ८ हजाराची घसरण

कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सोन्याच्या दरावर चांगलाच परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. मुळात गत वर्षी ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याच्या भावाने प्रती १० ग्रॅमसाठी ५६ हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यामध्ये आता अर्थात मागील अकरा महिन्‍यात जवळपास आठ हजार रुपयांची घसरण झाली आहे.

Gold
शिक्षक पात्रता परीक्षा आयोजनाला मान्यता

चांदीचा भाव

तसेच चांदीच्या दरात देखील मोठा बदल झालेला पाहायला मिळत आहे. गेल्या महिन्यात, १ जून रोजी चांदीची किंमत ही ७२,६०० रुपये इतकी होती. त्यानंतर किंमतीत घट होऊन ती ७० हजारांच्या आत आली. ७ जुलै रोजी चांदीच्या किमतीने पुन्हा एकदा ७० हजार रुपयांचा टप्पा ओलांडला. तर २० जुलैला पुन्हा एकदा चांदीच्या किंमतीत ६०० रुपयांची घसरण झाली तर आज पुन्हा एकदा ३०० रुपयांची घसरण झाली. यामुळे चांदीचे दर आज ७० हजार रूपयांवर आले आहेत.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com