जळगावात मनसेतर्फे महाआरती करत हनुमान चालिसा पठन

जळगावात मनसेतर्फे महाआरती करत हनुमान चालिसा पठन
जळगावात मनसेतर्फे महाआरती करत हनुमान चालिसा पठन
MNSSaam tv

जळगाव : जळगाव शहरातील शनीपेठ भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने हनुमान आरती करण्यात आली. त्यानंतर मंदिराच्‍या बाहेर भोंग्‍यांवर हनुमान चालीसा लावण्यात आली. या दरम्‍यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये; यासाठी पोलिसांचा (Police) मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला होता. (jalgaon news Hanuman Chalisa recitation while performing Maha Aarti on behalf of MNS)

MNS
Dhule: मनसे आंदोलक, पोलीसांमध्ये झाली झटापट

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी जाहीर केल्यानुसार राज्‍यभरात मनसेचे पदाधिकारी हनुमान मंदिरात आरती व हनुमान चालिसा पठन करायच्‍या तयारीत आहेत. त्‍यानुसार आज (Jalgaon) जळगाव शहरात देखील (MNS) मनसेतर्फे हनुमान चालीसा पठन करण्यात आले.

शनीपेठ मंदिरात भोंग्‍यावर चालिसा

मनसेने आज सकाळी शहरातील शनी पेठेतील शनी मंदिरात महाआरती करून भोग्यांवर हनुमान चालीसा लावण्याचा कार्यक्रम आजपासून सुरुवात करण्यात आला. यावेळी महानगराध्यक्ष विनोद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष आशिष सपकाळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र आले होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.