हतनूरचे १६ दरवाजे पूर्ण उघडले; तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

हतनूरचे १६ दरवाजे पूर्ण उघडले; तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
हतनूरचे १६ दरवाजे पूर्ण उघडले; तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Hatnur dam

भुसावळ (जळगाव) : हतनूर धरणाच्‍या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने आज सकाळी सातला धरणाचे १६ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. आज (ता.१२) सकाळी तापी नदीपात्रात ४५ हजार ८०३ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहेत. (jalgaon-news-hatnur-dam-overflow-and-16-door-open-today-morning)

जळगाव जिल्ह्यात तुरळक स्‍वरूपाचा पाऊस होत आहे. मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून देखील जोरदार पाऊस झालेला नाही. मात्र तापी नदीच्‍या वरच्‍या भागाकडे पाऊस होत असल्‍याने तसेच हतनूर धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला. यामुळे धरण भरले असल्याने आज सकाळी सातला काही दरवाजे उघडण्यात आले आहे.

Hatnur dam
धुळ्याची लालपरी झाली हायटेक..७८७ बसला जीपीएस सिस्टिम

सतर्कतेचा इशारा

पुढील २४ तासात पाणी प्रवाह अजून वाढण्याची शक्यता असल्याने हतनूर धरणाचे खालील गावांमधील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये कुणीही आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. असे आवाहन कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग यांचेतर्फे करण्यात आले आहे. पाणी पातळीत सतत वाढ होणार असल्याने तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी नदी काठावर जावू नये. आपली गुर-ढोरे नदीकाठी जावू देऊ नये व नदीकाठी असल्यास सुरक्षित स्थळी हलवावी. नदी काठावर असलेले उपसा पंप तात्काळ सुरक्षित स्थळी हलवावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com