पोस्ट ‘कोविड’च्या रुग्णसंख्येत वाढ; जाणवताय हे विकार

पोस्ट ‘कोविड’च्या रुग्णसंख्येत वाढ; जाणवताय हे विकार
Post covid
Post covid

जळगाव : कोरोना झाल्यानंतर अनेकांना पोस्ट कोविडच्या व्याधींनी ग्रासण्यास सुरवात झाली आहे. त्यातील एक ‘म्युकरमायकोसिस’ आजार आहे. डोळा निकामी होणे, मानसिक ताण, केसगळती होणे, हाडांना दुखापत होणे, स्कीन विकाराचे रुग्ण वाढत असल्याचे चित्र असल्याची माहिती वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली. (jalgaon-news-health-news-Increase-in-the-number-of-patients-with-post-covid)

कोविड होऊन गेलेल्यांपैकी काही रुग्णांना ‘म्युकरमायकोसिस’ ही व्याधी होते. त्यात कान, नाक, घशाला त्रास होतो. डोळे व मेंदूपर्यंतच्या व्याधीची तीव्रता होताना दिसतात. म्युकरमायकोसिस झालेले रुग्ण जळगावसह नाशिक, पुणे, मुंबईत जाऊन उपचार घेताना दिसतात. अगोदरच कोविडने आजारी असलेल्यांची शक्ती कमी झालेली असते. त्यात त्यानंतरच्या व्याधींवर उपचार करण्यासाठी रुग्णांना वेळ आणि पैसाही खर्च करावा लागत आहे.

संवेदना हरवते

पोस्ट कोविडमध्ये फुफ्फुसांमध्ये डॅमेज होते. श्‍वास घेण्यास त्रास होतो. हृदयासंदर्भात ‘मायको कार्डिस्ट’ व्याधी होते. पेशींवर सूज होते. अनेकांच्या पेशी मृत होतात. ज्यात पेशींची संवेदना हरवलेली असते. संधिवाताचा त्रासही रुग्णांना होतो. दीर्घ काळ मद्यपान केल्याचाही परिणाम किडनीवर होतो. हाडांचा त्रास सुरू होतो.

मानसिक खच्चीकरण

कोविड झालेल्यांची मानसिक स्थिती विचित्र झालेली असते. या आजारामुळे शक्ती क्षीण होते. अनेकांचा उपचारासाठी खर्च मोठा होतो. त्यामुळे रुग्णांची आर्थिक स्थिती कमकुवत होते. आता आपले कसे होणार, कुटुंबाचे कसे होणार याची चिंता त्यांना सतावते. यामुळे मानसिक तणावात वाढ होते.

कातडीचे विकार

कोविड झालेल्यांना कातडीचे अनेक विकार जडतात. त्यात पायांना भेगा पडणे, चेहरा, हातापायावर रेषा पडणे, कातडीला खाज सुटते. यामुळे रुग्णाला त्रास होतो.

Post covid
मित्रांनो माफ करा, गुडबाय करण्याची वेळ आलीय; FB पोस्ट टाकत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

‘म्युकरमायकोसिस’ रुग्णांना सर्वांत मोठा धोका डोळा, कान, मेंदूला असतो. यामुळे संबंधित रुग्णाला म्युकरमायकोसिसचे निदान होताच तातडीने उपचार घेणे गरजेचे ठरते. लवकर निदान होऊन उपचार केले तर शस्त्रक्रियेची गरज पडत नाही.

-डॉ. धमेंद्र पाटील, नेत्ररोगतज्ज्ञ

कोविडनंतर अनेकांना हिप जॉइंटचा त्रास सुरू झाला आहे. युवकांमध्ये ही समस्या अधिक आहे. कोविडनंतर हा त्रास झाला तर युवकांनी लागलीच एमआयआर करावे. स्टेज पहिली किंवा दुसरी असेल तर औषधोपचाराने बरे होता येईल. तिसरी व चौथी स्टेज असेल तर हिप रिप्लेसमेंट थेरपी करून टोटल हिप रिप्लेसमेंट करावी.

-डॉ. मनीष चौधरी, जॉइंट रिप्लेसमेंट स्पेशालिस्ट

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com