पुन्हा उष्णतेची लाट; वाढलेला उकाडा ठरतोय तापदायक

पुन्हा उष्णतेची लाट; वाढलेला उकाडा ठरतोय तापदायक
पुन्हा उष्णतेची लाट; वाढलेला उकाडा ठरतोय तापदायक
TemperatureSaam tv

जळगाव : एप्रिल महिन्‍याच्‍या सुरवातीपासून तापमानात सातत्‍याने वाढ होत राहिली आहे. शिवाय तीन वेळेस उष्णतेची लपाट देखील येवून गेल्‍या आहेत. यातच गेल्‍या दोन– तीन दिवसांपासून उकाडा वाढला आहे. यात आता पुन्‍हा (Tempearture) उष्णतेच्‍या लाटेची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. (jalgaon news Heat wave again Increased temperature is becoming hot)

Temperature
धुळ्यात सकाळची अजान भोंग्यांविनाच; पोलिसांचा बंदोबस्‍त

मागील दीड महिन्यापासून जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात तापमानाचा पारा सतत वाढत आहे. मार्च व एप्रिल महिन्याप्रमाणेच मे महिन्यातही तापमानाचा पारा ४५ अंशांपेक्षा अधिकच राहण्याची शक्यता आहे. यात जिल्‍ह्यात दरवर्षी वैशाखा वणवा मे महिन्यात पेत असल्‍याचा अनुभव जळगावकरांना येत असतो. त्‍यानुसार यंदा देखील कोणताही प्रकारे दिलासा मिळण्याची शक्यता नाही.

पुढील आठवडा ठरणार तापदायक

मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात जिल्ह्यात उष्णतेसोबत उकाडा देखील वाढला आहे. मार्च, एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यातील पहिला आठवडा तापदायक ठरणार असून पुढील काही दिवसांत काही ठिकाणी अवकाळी पाऊस होण्याचीही शक्यता किंवा ढगाळ वातावरण निर्माण होऊन तापमानासह उकाड्यात प्रचंड होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.