अतिवृष्‍टीचा फटका; जळगाव जिल्‍ह्यात सहाशेहून अधिक घरांचे नुकसान

अतिवृष्‍टीचा फटका; जळगाव जिल्‍ह्यात सहाशेहून अधिक घरांचे नुकसान
Heavy Rain
Heavy Rain

जळगाव : जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला. त्यात सोमवारी आणि मंगळवारी काही भागात अतिवृष्टी झाली आहे. या मुसळधार पावसामुळे जिल्‍ह्यात २ ते ८ सप्टेंबर दरम्‍यान ६०७ कच्च्या घरांची पडझड झाली. तर आठ घरे पूर्ण कोसळली आहेत. त्याशिवाय २७ झोपड्या आणि १३ दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीत सातजण जखमी झाले असून, ३६ जनावरांचादेखील बळी या पावसाने घेतला आहे. यात सर्वाधिक नुकसान हे जामनेर तालुक्यात झाले आहे. (jalgaon-news-Heavy-rain-Damage-to-more-than-600-houses-in-Jalgaon-district)

जिल्ह्यात सोमवारी आणि मंगळवारी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार मंगळवारी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यात जामनेर तालुक्यात तोंडापूर बंधाऱ्यात एकजण वाहून गेला. तसेच त्यात तालुक्यात १५२ घरांचे नुकसान झाले; तर २३ झोपडी, ९ गोठे आणि पहूर व इतर गावांच्या बाजारपेठेतील १३ दुकानांचे नुकसान झाले आहे.

भडगाव तालुक्‍यात सर्वाधिक पावसाची नोंद

भडगाव तालुक्यात अतिवृष्टी जिल्हा प्रशासनाकडे असलेल्या नोंदीनुसार भडगाव तालुक्यात ८ सप्टेंबरला ७१.१ मिली एवढा पाऊस झाला. तर अमळनेरला ६४ मिली पावसाची नोंद झाली. जळगावमध्ये ४२.९ मिली पाऊस झाला. जामनेरला ६०.३ मिली पावसाची नोंद करण्यात आली आहे.

Heavy Rain
नुकसानग्रस्‍तांना लवकरात लवकर मदत; आमदार कुणाल पाटलांचे आश्‍वासन

चाळीसगावमध्‍ये सर्वाधिक घरांची पडझड

मागील आठवड्यात चाळीसगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्‍य पाऊस झाला. याचा मोठा फटका बसला आहे. या पावसात २६ जनावरे या दगावली, तर एकट्या चाळीसगाव तालुक्यात २३३ घरांची पडझड झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com