जामनेर तालुक्‍यात अतिवृष्‍टी; अनेक गावांमध्‍ये शिरले पाणी

जामनेर तालुक्‍यात अतिवृष्‍टी; अनेक गावांमध्‍ये शिरले पाणी
जामनेर तालुक्‍यात अतिवृष्‍टी; अनेक गावांमध्‍ये शिरले पाणी
अतिवृष्‍टी

जळगाव : जामनेर तालुक्यातील अनेक गावांमध्‍ये सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने तडाखा दिला. त्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतातील कपाशी, सोयाबीन, मका, केळी, तुर हे पिक देखील भुईसपाट झाले आहेत. (jalgaon-news-Heavy-rainfall-in-Jamner-taluka-Water-seeped-into-many-villages)

जळगाव जिल्‍ह्यातील जामनेर तालुका परिसरात सोमवारी मध्‍यरात्रीनंतर अतिवृष्टीने झोडपले. तालुक्यातील अनेक गावात अतिवृष्टी व चक्रीवादळामुळे भागदरा, तोंडापूर व ओझर या गावांमध्ये पावसाचे पाणी घुसले असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. प्रामुख्याने तालुक्यातील ओझर गावामध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास चक्रीवादळ अतिवृष्टी झाली. भागदरा या गावातील काही घरांमध्ये पाणी शिरले.

शेताचे मोठे नुकसान

मुसळधार पावसामुळे अनेक शेतातील कपाशी वाहून गेली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच तोंडापूर या गावामध्ये नदीला पूर आल्यामुळे दोघा गावाचा संपर्क तुटला आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टीच्या पावसामुळे नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने ओझर, तळेगाव, टाकळी आणि तोंडापूर या गावांमध्ये तुलनेत जास्त हानी झाली आहे.

अतिवृष्‍टी
शिरूर परिसरात जोरदार पाऊस; घरांची झाली पडझड

तात्‍काळ मदतीच्‍या सुचना

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासनाला तातडीने मदतकार्य करण्याच्‍या सुचना दिल्‍या आहेत. गावांमध्ये पाणी शिरले असून शासकीय पातळीवर तात्काळ मदत करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. याबाबत तहसीलदार अरूण शेवाळे व त्‍यांची टीम आपत्तीग्रस्त गावांना भेटी देत असून त्यांनी मदतकार्य पोहचवित आहेत.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com