चाळीसगाव तालुक्‍यात पुन्‍हा अतिवृष्‍टी; शेतातील पिके पाण्याखाली
Heavy Rain

चाळीसगाव तालुक्‍यात पुन्‍हा अतिवृष्‍टी; शेतातील पिके पाण्याखाली

चाळीसगाव तालुक्‍यात पुन्‍हा अतिवृष्‍टी; शेतातील पिके पाण्याखाली

चाळीसगाव (जळगाव) : चाळीसगाव तालुक्‍यातील मेहूणबारे, खडकीसीम, वरखेडे भागात रविवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिके पाण्याखाली गेली आहेत. तसेच खडकीसीम आणि मेहूणबारे या गावांचा संपर्क नाल्याला आलेल्या पुरामुळे रात्रभर तुटला होता. अति पावसामुळे मोट्या प्रमाणावर शेतांमध्ये पाणी घुसले असून आता ओल्या दुष्काळाचे संकट घोंगावू लागले आहे. (jalgaon-news-Heavy-rains-again-in-Chalisgaon-taluka-Underwater-crops)

जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारल्याने कोरड्या दुष्काळाचे सावट येते की काय अशी शक्यता होती. मात्र पावसाचे आगमन झाले. त्यामुळे पिकांना जीवदान मिळाले. त्यानंतर मात्र पावसाचा तडाखा गेल्या १०-१५ दिवसांपासून बसत आहे. रात्रंदिवस कोसळणाऱ्या पावसामुळे पिकांना जबर फटका बसू लागला आहे. मेहूणबारे परिसरात परवा झालेल्या अतिवृष्टीने उभी पिके पाण्यात गेली असून पिके सडण्याच्या मार्गावर आहेत.

खडकीसीम गावाचा रात्रभर संपर्क तुटला

मेहूणबारे मंडळात खडकीसीम, वरखेडे भागात काल अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली. रविवारी (ता.५) झालेल्या नोंदीनुसार तब्बल ६८ मिमी पाऊस झाला. खडकीसीम गावाच्या प्रवेशद्वारापर्यंत पाणी आले होते; परिणामी या गावाचा इतर गावांशी रात्रभर संपर्क तुटला होता. आज सकाळी पाणी कमी झाल्याने वाहतुक सुरळीत झाली. रात्रभर देखील पाऊस सुरू असल्याने खडकीसीम धरणाकडे पाण्याचा विसर्ग जोरात होता. परिसरातील लहान मोठे पाणलोट भरल्याने पाणी गिरणा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर जात आहे.

Heavy Rain
साज चढविण्यापुर्वीच बैलाचा मृत्‍यू; दुर्देवी घटनेने शेतकरी कुटुंबाचे अश्रू थांबेना

घरांची पडझड

दरम्यान सततच्या पावसामुळे वरखेडे गावात मोठ्या प्रमाणावर घरांची पडझड होत असून या नुकसानीचे आज तलाठी यांच्याकडून पंचनामा करण्यात आला. तरी शासनाने आर्थिक मदत तातडीने द्यावी अशी मागणी होत आहे.

चाळीसगाव तालुक्यात आजची पर्जन्यमान स्थिती

चाळीसगाव मंडळ - ३६ मि.मी.

बहाळ- ५५ मि.मी.

मेहूणबारे- ५१ मि.मी.

हातले- २५ मि.मी.

तळेगाव- ९ मि.मी.

शिरसगाव- ८० मि.मी.

खडकी - २३ मि.मी.

एकूण पर्जन्यमान- २७९ मि.मी.

सरासरी पर्जन्यमान - ३९.८५ मि.मी.

आतापर्यंत झालेला पाऊस- ८२०.७८मि.मी.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com