Silver Price: चांदीला उच्‍चांकी दर; दिवसभरात १९०० रूपयांची वाढ

चांदीला उच्‍चांकी दर; दिवसभरात १९०० रूपयांची वाढ
Silver Price
Silver PriceSaam tv

जळगाव : मागील पंधरा दिवसांपासून सोने व चांदीच्‍या दरात सातत्‍याने वाढ होत आहे. या दरवाढीत (Silver) चांदीचे दर प्रतिकिलो उच्चांकी ७० हजार रुपयांवर पोहोचले आहे. एका दिवसातील १९०० रुपयांची तर महिन्याभरात सहा हजार रुपयांची वाढ झाली आहे. (Breaking Marathi News)

Silver Price
Shirpur News: पिसाळलेल्या कुत्र्याचा चावा; तरूणाचा मृत्‍यू, बालकाची प्रकृती गंभीर

आंतरराष्ट्रीय बाजारात होत असलेल्‍या चढउतारामुळे सोने– चांदीचे (Gold And Silver) दर वाढत आहेत. जगभरातील प्रमुख बँकांकडून सोन्याची खरेदीत वाढ झाल्याने सोन्याच्या दरात वाढ होत आहे. यामुळेच आठवडाभरापासून सोने व चांदीचे दर सातत्‍याने वाढत आहे.

महिनाभरात ६ हजाराने वाढ

या दरम्‍यान सोमवारी चांदीचे दर प्रतिकिलो ६८ हजार १०० रूपयांवर होते. तेच दर मंगळवारी ६९ हजार ७२२ झाले. तर दुपारनंतर ७० हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचले. महिनाभरापूर्वी चांदी प्रतिकिलो ६४ हजार रुपये होती. त्यात सहा हजारांची वाढ होऊन मंगळवारी ते ७० हजार रुपये प्रती किलोवर पोहोचले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com