तापमानाने लाहीलाही; जळगावचे तापमान ४४ अंशांवर

तापमानाने लाहीलाही; जळगावचे तापमान ४४ अंशांवर
Temperature
TemperatureSaam tv

जळगाव : विदर्भात सलग पाच दिवस उष्णतेची लाटेचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असला, तरी जळगाव जिल्ह्यात उन्हाचे तीव्र चटके जाणवू लागले आहेत. याचाच परिणाम म्हणून की सोमवार (ता. ९)चे तापमान ४४ अंश नोंदविण्यात आले. आणखी (Jalgaon News) पुढील काही दिवस उष्णतेचे राहणार असल्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होताना दिसत आहे. (Jalgaon news high temperature at 44 degrees)

Temperature
औरंगाबादेत 300 हून अधिक घरांवर फिरणार बुलडोजर; प्रशासनाकडून तयारी पूर्ण

सकाळी दहापासूनच उन्हाचे तीव्र चटके जाणविण्यास सुरवात होते. सोमवारी सकाळी अकरानंतर तर उन्हाच्या झळा (Temperature) कार्यालयात बसल्यावरही येत होत्या. कडक उन्हामुळे दुपारनंतर अनेक भागातील रस्ते निर्मनुष्य झाल्याचे चित्र होते. कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांनी डोक्यावर रूमाल, टोपी बांधल्याचे दिसून आले. उन्हापासून सुटका मिळण्यासाठी ताक, लस्सी, शीतपेय, उसाचा रस यांना प्रचंड मागणी वाढली आहे.

महामार्गावरही शुकशुकाट

शहरातून जाणाऱ्या महामार्गावर दुपारी एकनंतर शुकशुकाट दिसून आला. अनेक वाहनधारक झाडाखाली वाहने लावून उन्हापासून बचाव करताना दिसत होते. बाजारपेठांमध्येही दुपारी ग्राहकांअभावी दुकानदार ग्राहकांच्या प्रतिक्षेत होते. सायंकाळी सहानंतर मात्र शहरातील बाजारपेठांतील गर्दी वाढली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com