वृद्ध महिलेचा उष्‍माघाताने मृत्‍यू; शेतात गेल्‍या त्‍या परतल्‍याच नाही!

वृद्ध महिलेचा उष्‍माघाताने मृत्‍यू; शेतात गेल्‍या त्‍या परतल्‍याच नाही!
Jalgaon News
Jalgaon NewsSaam Tv

यावल (जळगाव) : अट्रावल येथील एका ८० वर्षीय वृद्ध महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची नोंद येथील पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. ही घटना बुधवार (११ मे) सकाळी उघडकीस आली. सदर महिला शेतात गेली (Jalgaon News) असता परत आलीच नाही. यानंतर त्‍यांचा शोध घेतल्यानंतर बुधवारी मृतावस्‍थेत आढळून आल्‍या. याबाबत येथील पोलिसात (Police) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (jalgaon news high temperature atrawal woman dies of heatstroke)

Jalgaon News
Jalgaon Corona Update: जळगावात पुन्‍हा आढळला कोरोनाचा रुग्ण

अट्रावल (ता.यावल) येथील लिलाबाई रामकृष्ण चौधरी (वय ८०) व त्यांचे पती रामकृष्ण चौधरी हे दोन वृद्ध राहतात. १० मे रोजी सकाळी लिलाबाई चौधरी या शेतात जाऊन येते असे सांगून घरातून गेल्या होत्या. त्या सायंकाळी घरी परत आल्याच नाही. यानंतर बुधवारी सकाळपासून त्यांचा शोध अट्रावलचे पोलीस पाटील पवन चौधरी, चंद्रकांत चौधरी, योगेश चौधरी, रवींद्र चौधरी, अभय पाटील, अभय महाजन यांच्‍यासह ग्रामस्थांनी घेतला असता लिलाबाई यांचा शोध सकाळी दहाला लागला.

पाण्याच्या चारीत मृतावस्थेत

अट्रावल शिवारातील नामदेव धनजी चौधरी यांच्या शेताजवळच्या बांधावर असलेल्या पाण्याच्या चारीत त्या मृतावस्थेत आढळून आल्या. त्या वयोवृद्ध होत्या. मंगळवारी उन्हाची तीव्रता अधिक असल्याने त्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला असावा असा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. मयत लिलाबाई यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात (Hospital) वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बी. बी. बारेला, वैद्यकीय अधिकारी डॉ. मयुर चौधरी यांनी शवविच्छेदन केले. परेश रमेश चौधरी यांच्या खबरीवरून येथील पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार अशोक जवरे करीत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com