उष्माघाताने एकाचा मृत्यू; कामाच्‍या शोधात गाठले होते जळगाव

उष्माघाताने एकाचा मृत्यू; कामाच्‍या शोधात गाठले होते जळगाव
Heat Stroke
Heat StrokeSaam tv

जळगाव : जळगावचे तापमान दरवर्षी रेकॉर्डब्रेक असते. गेल्या दोन वर्षात उष्माघाताच्या घटनांना कोरोनानिमित्त लावलेल्या संचारबंदीमुळे ब्रेक लागला होता. यंदा मात्र उष्माघाताने मार्च महिन्यात एक आणि त्यानंतर आता दुसरा मृत्यू (Death) झाला आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (jalgaon news high temperature One dies of heatstroke)

Heat Stroke
धुळे आगाराला रोज मिळू लागले वीस लाखांचे उत्पन्न

धरणगाव (Dharangaon) येथील रहिवासी किशोर खलपे (वय ३७) गेल्या पंधरा दिवसांपासून शहरातील हरिविठ्ठलनगरात राहणाऱ्या आपल्या बहिणीकडे आले होते. गुरुवारी (ता. २६) दिवसभर उन्हातच काम केल्याने त्यांना त्रास जाणवत होता. अशातच सायंकाळी ते हरिविठ्ठलनगरातील रिक्षा स्टॉपजवळ चक्कर येऊन कोसळले. परिसरातील नागरिकांसह नातेवाइकांनी तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (Jalgaon Medical Collage) दाखल केले. याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु असताना रात्री ११ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याच्या अंदाज व्यक्त होत असून तशी नोंद रामानंदनगर पोलिस (Police) ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार उषा सोनवणे या करीत आहे.

तीन लेकरं झाली अनाथ

साधारणत: तीन वर्षांपूर्वीच किशोर खलपे यांच्या पत्नीचे निधन झाले आहे. त्यांना तीन मुली व एक मुलगा असून तीन अपत्ये वडिलांसोबतच राहत होते. कामानिमित्त ते धरणगाव सोडून जळगावात आले होते. परंतु येथे उष्माघाताने त्यांचा बळी घेतल्याने त्यांच्या पश्चात आता मुलं पोरकी झाली आहे. त्यांच्या पश्चात आई, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com