मनोरूग्ण तरुणाची विहिरीत उडी; पाणबुड्यांच्या सहाय्याने काढला मृतदेह
suicide case

मनोरूग्ण तरुणाची विहिरीत उडी; पाणबुड्यांच्या सहाय्याने काढला मृतदेह

मनोरूग्ण तरुणाची विहिरीत उडी; पाणबुड्यांच्या सहाय्याने काढला मृतदेह

हिंगोणे (जळगाव) : यावल तालुक्‍यातील हिंगोणे येथील रहिवासी कल्पेश रमेश भोळे (वय ४२) या तरूणाने ग्रामपंचायतीच्या गाव विहीरीत उडी घेत आत्‍महत्‍या केली. सदर घटना सकाळी ५ ते ६ वाजेच्या सुमारास घडली असून, ही बाब विठ्ठल मंदीर परिसरातील नागरीकांच्या लक्षात येताच त्यांनी त्याच्या याबाबत नातेवाईकांना कळविले. (jalgaon-news-hingone-village-The-mentally-ill-young-man-jumps-into-the-well-suicide-case)

हिंगोणे येथील रहिवासी असलेला कल्‍पेश भोळे हा मनोरूग्‍ण असल्‍याने तो गावात फिरत असायचा. अशातच त्‍याने गावातील विहिरीत उडी मारल्‍याची चर्चा आहे. त्याला विहिरीतून काढण्यासाठी प्रयत्न केला मात्र विहिरीतील पाण्याची पातळी ४० फुट खोल असल्याने सापडून आला नाही. यानंतर पाणबुड्यांच्या सहाय्याने कल्पेश भोळे याचा मुत्यदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह विहिरीतून बाहेर काढल्यानंतर यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. कपील खाचणे यांनी फैजपूर पोलीस स्टेशनला खबर दिली. तसेच फैजपूर पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

suicide case
व्‍हॉट अ आयडीया..सायकलचे ब्रेक, मोटारसायकलचे ॲक्‍सीलेटर अन्‌ चारचाकीची निर्मिती

विहिरीवर लोखंडी जाळी नाही

हिंगोणा गावात चार ते पाच पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी आहे. या गावातील व परिसरातील विहिरींमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे. गावातील विहिरींवर लोखंडी जाडी बसविण्यात आलेल्‍या नाही. ग्रामपंचायतीने वारंवार ठराव करून सुद्धा या विहिरींवर लोखंडी जाळी बसवण्यात येत नसल्यामुळे गावातील ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झालेला आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com