नवजात शिशू, प्रसूत मातांसाठी अत्याधुनिक सुविधायुक्‍त रूग्णालय; पालकमंत्री गुलाबराव पाटील

नवजात शिशू, प्रसूत मातांसाठी अत्याधुनिक अशी सुविधायुक्‍त रूग्णालय; पालकमंत्री गुलाबराव पाटील
Gulabrao Patil
Gulabrao PatilSaam tv

जळगाव : कोविडच्या आपत्तीमुळे जिल्हा आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी प्रशासनाने जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत. यामुळे या आपत्तीवर आपण यशस्वीपणे मात केली असून आता माता व बाल संगोपन हॉस्पीटलच्या माध्यमातून नवजात शिशू आणि प्रसूत मातांसाठी अतिशय अत्याधुनिक अशी सुविधा उपलब्ध होणार असल्‍याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी म्‍हटले. (jalgaon news hospital for newborns and mothers)

Gulabrao Patil
निलगायच्या धडकेत रिक्षा उलटून एक ठार, चार जखमी

जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या (Hospital) परिसरात माता व बाल संगोपन हॉस्पीटल उभारण्यात येत असून या इमारतीच्या कामाचे भूमिपुजन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. शंभर खाटांचे रूग्णालय मॉडेल हॉस्पीटल म्हणून (Jalgaon News) लौकीकास येणार असून ते गोरगरिबांना वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

१४ महिन्‍यात रूग्णालय पूर्णत्‍वास

शासकीय आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या परिसरात उभारण्यात येत असलेल्या १०० खाटांची सुविधा असणार्‍या आणि तब्बल २८ कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेल्या माता व बाल संगोपन केंद्राच्या उदघाटन झाले. सदर हॉस्पीटल हे सुमारे १३ ते १४ महिन्यांमध्येच पूर्ण होणार असल्याची माहिती देखील पालकमंत्र्यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com