प्रेरणादायी..झोपडपट्टीतील ‘लक्ष्‍मी’ बनली त्‍यांच्‍यासाठी शिक्षिका

प्रेरणादायी..झोपडपट्टीतील ‘लक्ष्‍मी’ बनली त्‍यांच्‍यासाठी शिक्षिका
प्रेरणादायी..झोपडपट्टीतील ‘लक्ष्‍मी’ बनली त्‍यांच्‍यासाठी शिक्षिका
education

जळगाव : झोपडपट्टीतील वात्‍सव म्‍हटले तर कसलाही गंध नाही. दिवसभर काम अन्‌ रात्रीचा विसावा असे चित्र पाहण्यास मिळते. उदरनिर्वाहासाठ लहान मुलांना देखील कामाला लावले जाते. या सर्व परिस्‍थीतीत शिक्षण हे कोसो दूर राहून जाते. मात्र तिला शिक्षणाची आवड असल्‍याने ती नववीच्‍या वर्गात असून, झोपडपट्टीतील त्‍या बालकांसाठी ती शिक्षिका झाली आहे. (jalgaon-news-Inspirational-story-Lakshmi-more-from-the-slums-became-a-teacher-for-her-child)

education
महिलांनी फोडल्‍या दारूच्‍या बाटल्‍या; ग्रामपंचायत हरली अन्‌ केला ठराव

शहरातील अग्रवाल चौफुलीजवळ महामार्गालगत लाकडी बॅट, लाटणे व अन्य वस्तू बनवणारे अनेक कारागीर झोपड्या टाकून वात्‍सव्‍यास आहेत. कोरोना काळात त्‍यांचा चरितार्थ चालणे कठीण होते. यामुळे कोणी खायला आणले तर त्‍यांना जेवण मिळायचे. त्‍यांच्‍यातीलच मोरे परिवारातील लक्ष्‍मी ही शहरातील महापालिकेच्‍या शाळेत शिक्षण घेत आहे. इयत्‍ता नववीच्‍या वर्गात ती असून तिला शिक्षणाची आवड आहे.

बालकांना गोळा करून भरविते शाळा

कोरोना काळात गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद होत्या. लक्ष्मीच्या शेजारी राहणाऱ्या अनेक लहान मुलांना बाराखडी, गणिते, इंग्रजीचे वर्णाक्षरे यांचा विसर पडू नये; म्हणून तिने रोज तिच्या पद्धतीने या मुलांना रोज स्वतः अभ्यास करताना घरी बोलावून शिकविण्यास सुरवात केली. लक्ष्मीच्या शिकविण्याची पद्धत चांगली असल्याने अनेक लहान मूल लक्ष्मीच्या झोपडीतील शाळेत येऊ लागली आहेत. आम्ही जो पोटापाण्यासाठी व्यवसाय करतो आहे तो आमच्या मुलांनी करू नये अशी प्रतिक्रिया लक्ष्मीच्या काकाने दिली आहे.

तिची धडपड

नववीत शिकणारी लक्ष्मी मोरे ही विद्यार्थिनी कोरोना काळात शाळा बंद झाल्यापासून आजूबाजूच्या झोपडपट्टीमधील दहा- पंधरा बालकांना दररोज गोळा करते. त्यांच्याकडून बाराखडी गिरवून गणिते सोडवून घेते. आपल्यासोबत बालकांची ही पिढी घडावी. आई-वडिलांच्या कष्टाला फळ यावे; यासाठी ती धडपड करत आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com