Jalgaon ZP: जळगाव जिल्‍हा परिषदेचा ३३ कोटींचा शिलकी अर्थसंकल्‍प; अशी आहे तरतूद

जळगाव जिल्‍हा परिषदेचा ३३ कोटींचा शिलकी अर्थसंकल्‍प
Jalgaon ZP
Jalgaon ZPSaam tv

जळगाव : जिल्हा परिषदेचा २०२३-२४ चा ३० कोटींचा अर्थसंकल्प प्रशासक सीईओ डॉ. पंकज आशिया (Pankaj Aashiya) यांनी मंजूर केला. यंदाचा ३३ कोटी ८० लाख रुपयांचा शिलकी अर्थसंकल्‍पास (Jalgaon ZP) मंजुरी दिली आहे. यात एकूण अर्थसंकल्‍पाच्‍या ३३ टक्‍के तरतूद पंचायतराज कार्यक्रमासाठी केली आहे. शिवाय समाजल्‍याण, शिक्षणासाठीही भरीव तरतूद केली आहे. (Maharashtra News)

Jalgaon ZP
SSC Exam: सोशल मीडियामुळे दहावीच्‍या ९४३ विद्यार्थ्यांचा बुडाला पेपर; फसव्या वेळापत्रकामुळे शैक्षणिक नुकसान

जिल्‍हा परिषद सदस्यांचा कार्यकाळ मागील वर्षी २० मार्चला संपला. यामुळे सीईओंकडे मीनी मंत्रालयात प्रशासक म्‍हणून सीईओ डॉ. पंकज आशिया यांच्‍याकडे कारभाराची सर्व सूत्रे आहेत. अर्थसंकल्प अर्थ, वित्त लेखा विभागाने सादर केल्यानंतर त्यास मंजुरी देण्यात आली. बुधवारी (ता. ८) यासंदर्भात बैठक झाली. मुख्‍य लेखा व वित्‍त अधिकारी बाबूलाल पाटील उपस्थित होते.

पंचायतराज कार्यक्रमासाठी अधिक

जिल्‍हा परिषदेची सदस्‍य निवड प्रक्रिया होऊन पुढील वर्षी बॉडी स्‍थापन होईल. त्‍या अनुषंगाने २०२३-२४ साठी पंचायतराज कार्यक्रमासाठी सर्वाधिक तरतूद आहे. मागील वर्षी २ कोटी ७ लाख ६२ हजार रुपयांची तरतूद होती. यात ४ लाखांनी वाढ करून ६ कोटी १७ लाख २१ हजार इतकी वाढीव तरतूद केली आहे. यंदाच्‍या अर्थसंकल्‍पात समाजकल्‍याणसाठी २ कोटी ९१ लाख ८० हजार रुपयांची तरतूद आहे. याच विभागातंर्गत दिव्‍यांगासाठी १ कोटी २२ लाख रुपयांची तरतूद आहे.

मागील वर्षापेक्षा १० कोटी जादा

मागील वर्षीही सीईओ डॉ. आशिया यांनी अर्थसंकल्‍प मंजूर करत २०२२-२३ साठी २२ कोटी ३३ लाखांचा अर्थसंकल्प केला होता. यात यंदा वाढ करत ३३ कोटी ८० लाखाच्‍या अर्थसंकल्‍पास मंजुरी दिली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात जिल्ह्यातील मुंद्राक शुल्क व जमिनी महसूल, अभिकरण शुल्क यासह विविध करातून वाढ होणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com