Crime: अगोदर सीसीटीव्‍हीची दिशा बदविली मग फोडले एटीएम

अगोदर सीसीटीव्‍हीची दिशा बदविली मग फोडले एटीएम
broke the ATM
broke the ATMsaam tv

जळगाव : जामनेर शहरातील बाबाजी मार्केटमध्‍ये असलेल्‍या आयडीबीआय बँकेचे एटीएम चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने कापले. एटीएम मशीन फोडून यातील तब्बल १२ लाख ७८ हजाराची रोकड लांबविल्‍याची माहिती समोर आली आहे. (jalgaon news jamner Changed the direction of CCTV then broke the ATM)

broke the ATM
Jalgaon: आठ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्‍याचार

जामनेर (Jamner) शहरातील बाबाजी मार्केटमधील वरच्या मजल्यावर आयडीबीआय बँकेचे एटीएम आहे. प्रजासत्‍ताक दिनी अर्थात २६ जानेवारीच्‍या रात्री तीन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मशीन फोडण्याचे काम केले. याप्रकरणी जामनेर पोलिसात (jamner Police) अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

सीसीटीव्‍हीची दिशा बदलविली

एटीएममधील (ATM Machine) सीसीटीव्ही कॅमेऱ्याची आधी दिशा बदलवली. त्यानंतर सायरन तोडून बाहेर फेकून दिला. यानंतर एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने कापून त्यातील १२ लाख ७८ हजाराची रोकड कॅश वॉलटसह चोरून नेले. याप्रकरणी आयडीबीआय बँकेचे (IDBI Bank) जामनेर शाखाधिकारी प्रसून परेशनाथ घोष यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.नि. किरण शिंदे हे करीत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com