आजी- माजी पालकमंत्री सोबत; जामनेर तालुक्यात नुकसानीची पाहणी

आजी- माजी पालकमंत्री सोबत; जामनेर तालुक्यात नुकसानीची पाहणी
आजी- माजी पालकमंत्री सोबत; जामनेर तालुक्यात नुकसानीची पाहणी

जामनेर (जळगाव) : जामनेर तालुक्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आजी- माजी पालकमंत्री एकत्र आले होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील हे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी जावून तेथून पाहणीसाठी गेले. (Jalgaon-news-jamner-flood-aria-tour-gilabrao-patil-and-girish-mahajan-meet)

राज्यात भाजप व शिवसेना यांच्यात मतभेद सर्वश्रुत आहेत. विरोधात असूनही अनेक नेते हे एकमेकांशी सलोख्याने वागतात. याचे चित्र आज पहन्यास मिळाले. आज पालकमंत्री गुलाबराव पाटील हे अतिवृष्टी आणि चक्रीवादळाने नुकसान झालेल्यांची पाहणी करण्यासाठी जामनेर तालुक्याच्या दौर्‍यावर गेले. या दौर्‍याच्या प्रारंभी गुलाबराव पाटील यांनी आमदार गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी भेट दिली. याप्रसंगी आमदार महाजन आणि नगराध्यक्षा साधना महाजन यांनी पालकमंत्र्यांचे स्वागत केले. याप्रसंगी आजी- माजी पालकमंत्र्यांनी नाश्ता करतांना गप्पा केल्या. यानंतर पालकमंत्र्यांचा ताफा अतिवृष्टीग्रस्तांची पाहणी करण्यासाठी तालुक्यातील ओझर, तोंडापूर आदी गावांकडे रवाना झाला.

तालुक्याचे आमदार म्हणून सोबत

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिष्टाचाराचे पालन करून तालुक्याचे आमदार म्हणून गिरीश महाजन यांच्यासोबत नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली असल्याचे सांगितले. यात दौर्‍यात शिवसेना व भाजपसह राष्ट्रवादी व अन्य पक्षांचे नेते व पदाधिकारी देखील सहभागी झाले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com