जळगाव : जामनेर पंचायत समितीत शेड बांधणीचा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर कामाची वर्क ऑर्डर काढायची होती. यासाठी तीन हजाराची लाच घेतांना पंचायत समितीतील कनिष्ठ लिपीकाला अटक करण्यात आली आहे. (jalgaon news jamner panchayat samiti Bribe for shed construction work)
शेवगे पिंप्री (ता. जामनेर) (Jamner) येथील तक्रारदार यांनी गाईचा गोठा शेड बांधणीचा प्रस्ताव मंजुर झाला होता. शेडच्या बांधणीचे काम सुरू करण्यासाठी लागणारी वर्क ऑर्डर मिळवून देण्याच्या मोबदल्यात पंचायत समितीचे कनिष्ठ लिपीक वसंत पंडीत बारी याने तीन हजार रूपयांची मागणी (Bride) केली. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार दिली.
सकाळीच रचला सापळा
प्राप्त तक्रारीनुसार लाचलुचपत विभागाने आज (१३ जानेवारी) सकाळी सापळा रचत कनिष्ठ लिपीत वसंत बारी यास पंचायत समिती कार्यालयात (Jamner Panchayat Samiti) तीन हजार रूपयांची लाच घेतांना रंगेहाथ ताब्यात घेतले. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस उपअधिक्षक शशिकांत पाटील, पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील आदींनी सदरची कारवाई केली.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.