आता तरी तोंडाला पाने पुसू नका; माजी मंत्री गिरीश महाजन यांचा शासनावर निशाणा

आता तरी तोंडाला पाने पुसू नका; माजी मंत्री गिरीश महाजन यांचा शासनावर निशाणा
आता तरी तोंडाला पाने पुसू नका; माजी मंत्री गिरीश महाजन यांचा शासनावर निशाणा
गिरीश महाजन

जामनेर (जळगाव) : चक्रीवादळासह मुसळधार पावसामुळे जामनेर तालुक्यातील शेकडो शेतकरी व नागरिकांना फटका बसला आहे. केळी, मका, कपाशी या पिकांचे नुकसान झाले असून घरांवरील पत्रे उडाल्‍याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. यामुळे शासनाने त्‍वरीत पंचनामे करून मदत करावी. किमान आतातरी तोंडाला पाने पुसण्याचे काम शासनाने करू नये; असे माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी आज म्‍हणाले. (jalgaon-news-jamner-taluka-heavy-rain-drop-and-flood-Former-Minister-Girish-Mahajan-targets-the-government)

जामनेर तालुक्‍यात दोन दिवस चक्रीवादळासह मुसळधार पाऊस झाला. यामुळे झालेल्‍या नुकसानीची पाहणी करत माजी मंत्री आमदार गिरीश महाजन आज सकाळपासून आपत्तीग्रस्तांशी संवाद साधला. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले. आपला संसार उघडा पडल्याचे दु:ख अनेकांनी व्यक्त केले असता आमदार महाजन यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्‍वासन दिले.

पुर्वीच्‍या पंचनाम्‍यांची मदत अजून नाही

जामनेर तालुक्‍यातील शेतकरींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्‍तांना तात्‍काळ मदत करण्याची मागणी महाजन यांनी केली आहे. परंतु, गेल्‍या दीड वर्षात अनेक नुकसानीचे पंचनामे झाले असताना शासनाकडून अद्याप कोण्यात्‍याही प्रकारची मदत देण्यात आलेली नाही. शिवाय गेल्‍या आठवड्यात चाळीसगाव तालुक्‍यात झालेल्‍या नुकसानीची मदत देखील मिळालेली नाही. यामुळे आतातरी शासनाने असे न करत तात्‍काळ मदत करण्याची मागणी महाजन यांनी केली.

गिरीश महाजन
मन्याड धरणक्षेत्रात ढगफुटी सदृश्‍य पाऊस; महापुरात वाहिल्‍या संसारपयोगी वस्‍तू

सव्‍वादोनशे घरांचे उडाले पत्र

मंगळवारी झालेल्‍या चक्रीवादळाचा फटका जामनेर तालुक्‍यातील दहा ते बारा गावांना बसला आहे. यातील २२५ घरांचे पत्रे उडाल्‍याची माहिती प्रांत अधिकारी यांनी दिली. घरांचे नुकसान झालेल्‍यांना मंदीरात स्‍थलांतरीत केले आहे. तर पुरात २३ गुरे वाहून गेली व तीन युवक वाहून गेले असताना दोघांना वाचविता आले असून एकाला मात्र वाचविता आले नसल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com