‘पब्जी’चा बळी; सुसाईट नोटमध्‍ये तरूणीने लिहिलेय कारण

‘पब्जी’चा बळी; सुसाईट नोटमध्‍ये तरूणीने लिहिलेय कारण
‘पब्जी’चा बळी; सुसाईट नोटमध्‍ये तरूणीने लिहिलेय कारण
PUBG Suicide

जामनेर (जळगाव) : बारावी शाखेमध्ये शिकणाऱ्या वीस वर्षीय तरुणीने पब्जी खेळाच्या नादात आत्महत्या केली. तशी सुसाईड नोटया मुलीने आत्‍महत्‍या करण्यापुर्वी लिहून ठेवली आहे. (jalgaon-news-jamner-young-girl-suicide-pubg-game)

जामनेरातील नगारखाना परिसरातील नम्रता पद्माकर खोडके (मूळ रा. भराडी, ता. जामनेर) या बारावीत शिकणाऱ्या वीस वर्षीय तरुणीने रविवारी (ता. १०) पब्जी खेळाच्या नादात एका स्टेपवर येऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मृत्युपूर्वी मृत तरुणीने लिहिलेली चिठ्ठीही सापडल्याचे सांगण्यात येते. मृत नम्रताचे वडील खासगी स्थानिक डॉक्टरांकडे सहाय्यक डॉक्टर म्हणून काम पाहतात. आपली तरुण मुलगी गेल्यामुळे आई- वडिलांवर आभाळ कोसळल्यासारखे झाल्याचे दृष्य होते.

PUBG Suicide
औरंगाबाद: राहत्या घरात प्राध्यापकांची गळा चिरून निर्घृण हत्या

आई घराच्‍या बांधकामाठिकाणी

स्वतःच्या घराचे बांधकाम सुरू असून, आई वाकी रोडवर घरावर पाणी मारायला गेल्या होत्या आणि इकडे तरुणीने असे कृत्य केले. नम्रता खोडके हिने स्वतः च्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. ही युवती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात द्वितीय वर्ष बीसीए या वर्गात शिक्षण घेत होती. घटनास्थळी पोलिस निरीक्षक किरण शिंदे, नगरसेवक हेमंत वाणी, अतीष झाल्टे, दत्तात्रय सोनवणे, जालमसिंग राजपूत, सुभाष शिंदे, लोकेश डांगी आदी होते. उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे दाखल केले असता डॉ. हर्षल चांदा यांनी तिला मृत घोषित केले. सुसाईड नोट सुद्धा लिहिली आहे. तसेच मोबाईल स्वीच ऑफ असल्याने अधिक माहिती मिळू शकलेली नाही. पोलिस यंत्रणा अधिक तपास करीत आहेत.

सुसाईड नोट आढळली

पब्जी या मोबाईलवरील खेळ खेळण्याच्या आमिषापोटी लहान मुलांसह तरुणाईलाही आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना समोर असताना शहरातील एका २० वर्षीय महावीद्यालयीन तरुणीलाही पब्जी खेळाच्या मोहापायी आत्महत्या करण्याची दुर्दैवी वेळ आली. नम्रता खोडके हिच्या खोलीत सुसाईड नोट आढळून आली असून, आपल्या आत्महत्येस कुणालाही जबाबदार धरू नये, अशा आशयाचा मजकूर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related Stories

No stories found.