JDCC Bank : सहकार पॅनल २० जागांवर विजयी

सहकार पॅनल २० जागांवर विजयी
JDCC Bank : सहकार पॅनल २० जागांवर विजयी
JDCC Bank

जळगाव : जळगाव जिल्हा बॅंकेवर माहाविकास आघाडी प्रणित सहकार पॅनलने आपला झेंडा फडकवला आहे. सहकार पॅनलचे २१ पैकी २० उमेदवार निवडून आले आहेत. तर एक अपक्ष उमेदवार भाजपचे आमदार संजय सावकारे अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले आहेत. (jalgaon-news-JDCC-Bank-Co-operation-panel-wins-20-seats)

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत महविकास आघाडी प्रणित सहकार पॅनलचे उमेदवार डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर, ॲड. रोहिणी खडसे विजयी झाल्या. राखीव सहा मतदार संघात सहकार पॅनलने बाजी मारली आहे. तर संस्था मतदार संघात सहकार पॅनलचे माजी मंत्री गुलाबराव देवकर विजयी झाले. त्यांना १ हजार ५०१ मते मिळाली.

JDCC Bank
भाजपने कॉग्रेससोबत हात मिळवणी; शिवसेना नेत्‍याचा आरोप

जिल्‍हा बँक निवडणुकीत इतर मागासवर्ग मतदार संघात सहकार पॅनलचे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील विजयी झाले. त्यांना २ हजार ३१६ मते मिळाली. त्यांचे विरोधी विकास पवार यांना २४२ मते मिळाली. अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून सहकार पॅनलचे श्यामकांत सोनवणे विजयी झाले. त्यांना २ हजार ४६४ मते मिळाली. व्हीजेएनटी मतदार संघात सहकार पॅनलचे मेहताब सिंग नाईक विजयी झाले. त्यांना २ हजार ३२८ मते पडली. महिला राखीव मतदार संघात सहकार पॅनलचे उमदेवार विद्यमान चेअरमन ॲड.रोहिणी खडसे व शैलजा निकम विजयी झाल्या. श्रीमती खडसे यांना २ हजार २३५ मते मिळाली. तर श्रीमती निकम यांना १ हजार ९२५ मते मिळाली आहेत.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com