जिल्हा बँक निवडणूक रणधूमाळी.. पहिल्याच दिवशी गेले इतके अर्ज

जिल्हा बँक निवडणूक रणधूमाळी.. पहिल्याच दिवशी गेले इतके अर्ज

जिल्हा बँक निवडणूक रणधूमाळी.. पहिल्याच दिवशी गेले इतके अर्ज

जळगाव : जळगाव जिल्हा बँकेसाठी २१ रोजी होणाऱ्या नोव्हेंबर निवडणुकीसाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे . पहिल्याच दिवशी १२७ अर्जांची विक्री करण्यात आली असून, विद्यमान संचालक व बँकेचे माजी अध्यक्ष चिमणराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मुहूर्त साधला. (jalgaon-news-jdcc-bank-election-candidate-form-submition-start)

जिल्हा बँकेसाठी सोमवारपासून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. निवडणूक सर्वपक्षीय झाल्यामुळे बिनविरोध करण्याचा प्रयत्न आहे. दुसरीकडे या निर्णयामुळे अनेक जण नाराज झाल्याने या निवडणुकीत बंडखोरीसोबतच अनेक जण अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. त्याचाच प्रत्यय सोमवारी दिसून आला. एकाच दिवशी १२७ अर्जांची विक्री झाली असल्याने या निवडणुकीसाठी अनेकांचे अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.

नवरात्रोत्सवचा मुहूर्त साधन्याचा प्रयत्न

सध्या नवरात्रोत्सव सुरू असून, याच काळातील मुहूर्त साधून उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर इच्छुक उमेदवारांचा भर आहे. त्यामुळे सोमवारी अर्ज खरेदी करून दसऱ्याचा आधीच उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी इच्छुकांनी केली आहे.

18 ऑक्टोम्बरपर्यंत मुदत

निवडणूक अर्ज सादर करण्यास सुरवात झाली आहे. १८ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवई यांनी दिली.

Related Stories

No stories found.