जिल्‍हा बँक निवडणुकीत नवा व्‍टीस्‍ट; कॉंग्रेसची स्‍वबळावर लढण्याची तयारी

जिल्‍हा बँक निवडणुकीत नवा व्‍टीस्‍ट; कॉंग्रेसची स्‍वबळावर लढण्याची तयारी
जिल्‍हा बँक निवडणुकीत नवा व्‍टीस्‍ट; कॉंग्रेसची स्‍वबळावर लढण्याची तयारी
JDCC Bank

जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील सर्वपक्षीय पॅनल निश्‍चीत झाले होते. परंतु, आता या निवडणुकीत नवा व्‍टीस्‍ट आला असून कॉंग्रेसने जिल्‍हा बँकेची निवडणुक स्‍वबळावर लढण्याची तयारी दर्शविली आहे. तशी भुमिका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी पत्रकार परिषदेतून स्‍पष्‍ट केली आहे. (jalgaon-news-JDCC-Bank-election-congress-ready-to-fight-on-it-own)

जिल्हा बँकेची निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्‍यानंतर मागील निवडणूकीप्रमाणे बँकेची निवडणूक सर्वपक्षीय पॅनल तयार केले होते. याकरीता भाजप, राष्‍ट्रवादी, कॉंग्रेस व शिवसेनेच्‍या नेत्‍यांची बैठक होवून तसा निर्णय घेण्यात आला होता. मात्र या सर्वपक्षीय पॅनल सोडत असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

JDCC Bank
भाजपचे बंडखोर नगरसेवकांची वापसी; शिवसेनेची सोडली साथ

भाजपसोबत कदापी जाणार नाही

जिल्‍हा बँकेच्‍या निवडणूकीत सर्वपक्षीय पॅनल उभे केले होते. परंतु, शेतकरी विरोधी काळे कायदे तयार करणाऱ्या भाजप पक्षासोबत कॉंग्रेस कदापी जाणार नाही. याकरीता राज्‍यात ज्‍याप्रमाणे महाविकास आघाडी सरकार आहे. त्‍यानुसार जिल्‍हा बँकेच्‍या निवडणूकीसाठी तिनही पक्षांनी एकत्र येवून निवडणूक लढववावी. तसे झाले नाही तर कॉंग्रेस ही निवडणूक स्वबळावर लढविणार असल्‍याचा निर्णय काँग्रेसने जाहीर केला.

Related Stories

No stories found.