Breaking जिल्‍हा बँकेसाठी एकनाथ खडसेंचा अर्ज
Eknath Khadse

Breaking जिल्‍हा बँकेसाठी एकनाथ खडसेंचा अर्ज

जिल्‍हा बँकेसाठी एकनाथ खडसेंचा अर्ज

जळगाव : जळगाव जिल्‍हा मध्‍यवर्ती बँकेच्‍या निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली. जिल्‍हा बँकेत सर्वपक्षीय पॅनल तयार केले असून, राष्‍ट्रवादी सर्वपक्षीय पॅनलकडून मुक्‍ताईनगर तालुका प्राथमिक विकास सहकारी सोसायटी मतदार संघातून एकनाथ खडसे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. (jalgaon-news-jdcc-bank-election-eknath-khadse-submit-form-ncp)

Eknath Khadse
विवाह काही दिवसांवर अन्‌ एकुलत्‍या एक मुलाचा मृत्‍यू

जिल्‍हा बँक निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज चौथा दिवस आहे. जिल्‍हा बँक निवडणुकीसाठी आतापर्यंत ३२२ अर्ज दाखल केले असून, आजच्‍या चौथ्‍या दिवशी मुक्‍ताईनगर तालुका प्राथमिक विकास सहकारी सोसायटी मतदार संघातून एकनाथ खडसे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्‍यांच्‍या कन्‍या रोहिणी खडसे–खेवलकर, राष्‍ट्रवादीचे जिल्‍हाध्‍यक्ष रवींद्रभैय्या पाटील, सुचक असलेले अतुल युवराज पाटील आदी पदाधिकारी उपस्‍थीत होते.

Related Stories

No stories found.