माकडांचा हल्‍ला; तरूणाचे हात– पाय झाले फॅक्चर

माकडांचा हल्‍ला; तरूणाचे हात– पाय झाले फॅक्चर
माकडांचा हल्‍ला; तरूणाचे हात– पाय झाले फॅक्चर

तोंडापूर (जळगाव) : कुंभारी बु. (ता. जामनेर) येथे माकडांनी धुमाकूळ घातला असून घरावरील माकड हाकलण्यासाठी गेलेल्या तरुणांनावर हल्ला चढविला. यात घरावरील पत्रे सटकुन पडल्याने प्रकाश मोरे याचा हात व पाय फॅक्चर झाले. सदर घटना आज (ता. १३) सकाळी घडली. (jalgaon-news-kumbhari-village-monkey-entry-and-boy-injured-monkey-attack)

कुंभारी बु. गावालगत अजिंठा लेणी डोंगररांग आहे. यामुळे त्या परिसरातील माकडे अन्न व पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येत असतात. गावात नेहमी माकडांचा वावर असतो. यातच गेल्‍या काही दिवसांपासून माकडांनी गावात धुमाकूळ घातला आहे. माकडे घरात देखील येत आहेत.

माकड घरात शिरले अन्‌

या दरम्‍यान आज आई स्वयंपाक करत असताना माकड घरात शिरले. त्‍या माकडाच्‍या मागे धावून हुसकावून लावण्यासाठी घरावर चढलेल्या प्रकाश नामदेव मोरे याच्या अंगावर माकडाने हल्ला केला असता मागे पळताना घरावरील पत्रे सटकल्याने घरात प्रत्रासह खाली पडला. यामुळे प्रकाशच्‍या पायावर पत्रे दगड पडल्याने पाय फॅक्चर तर पत्राने हाताचे बोट कापले गेली आहेत. जखमीला जळगाव येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले.

माकडांचा हल्‍ला; तरूणाचे हात– पाय झाले फॅक्चर
जळगावातील लाकडी गणपती..पिंपळाच्‍या झाडातून प्रकटले बाप्‍पा अन्‌ तेथेच झाली प्राणप्रतिष्ठा

एका माकडाला पकडण्यात यश

घटनेची माहिती माजी सरपंच सुरतसिंग जोशी यांनी वनविभागाचे अधिकारी महाजन याना दिली. वनविभागाने कुंभारी बु. येथे येवून पिंजरा लावून एका माकडाला पकडण्यात आले. यावेळी हिरामन जोशी, राजकुमार जोशी, ग्रामपंचायत शिपाई गणेश गोपाळ यांच्यासह गावकरी हजर होते. गावातील सर्वच माकडे पकडण्यात यावी व जखमी झालेल्या तरुणांला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी गावकऱ्यांनी वनविभागाचे हवालदार महाजन याना करण्यात आली

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com