महिनाभरात ४४१ जणांना भटक्या कुत्र्यांचा चावा
Dog BiteSaam tv

महिनाभरात ४४१ जणांना भटक्या कुत्र्यांचा चावा

महिनाभरात ४४१ जणांना भटक्या कुत्र्यांचा चावा

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या इंजेक्शन विभागामध्ये एप्रिलमध्ये एकूण ४४९ व्यक्तींनी पाळीवसह भटक्या प्राण्यांनी चावा घेतल्यामुळे दाखल होऊन (Jalgaon) इंजेक्शन व उपचार घेतले आहे. (jalgaon news last month 441 people were bitten by stray dogs)

Dog Bite
तयारी खरिपाची; २७ लाख कपाशी बियाणांची पाकिटे उपलब्ध

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (Jalgaon Medical Collage) ओपीडी काळात सकाळी इंजेक्शन विभाग येथे विविध प्राण्याच्या चाव्यावर प्रतिबंधात्मक इंजेक्शन घ्यायला नागरिक येतात. जिल्हाभरात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ वाढला आहे. या विभागामध्ये एप्रिल महिन्यात एकूण ४४१ व्यक्ती कुत्रा चावल्यामुळे (Dog Bite) उपचार घेण्यात आले होते.

९९ लहान बालकांचा समावेश

कुत्र्यांनी चावा घेतलेल्‍यांमध्‍ये २४५ पुरुष, ९७ महिला तर ९९ लहान बालकांचा समावेश आहे. उपचार घेणाऱ्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण जळगाव शहरातील आहेत. महिन्याभरात ५ रुग्णांना मांजर, १ जणांना डुकर तर २ जणांना माणसाने चावा घेतल्यामुळे उपचार करण्यात आले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.