Jalgaon News: अंघोळीदरम्‍यान गॅस गिझरची गळती; १६ वर्षीय मुलाचा गुदमरून मृत्यू

अंघोळीदरम्‍यान गॅस गिझरची गळती; १६ वर्षीय मुलाचा गुदमरून मृत्यू
Jalgaon News
Jalgaon NewsSaam tv

एरंडोल (जळगाव) : येथील रेणुकानगरमधील दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या १६ वर्षीय विद्यार्थ्याच्या अंघोळ करीत असताना गॅस (Gas) गिझरच्या गळतीमुळे बाथरूममध्येच गुदमरून (Death) मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता. २१) सकाळी दहाच्या सुमारास घडली. उत्कृष्ट क्रिकेटपटू असलेल्या युवा खेळाडूचा अकस्मात मृत्यू झाल्यामुळे क्रीडा विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Letest Marathi News)

Jalgaon News
Crime News : डॉक्टर पतीचे पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्य; अकोल्यातील धक्कदायक घटना

एरंडोल (Erandol) येथील रामनाथ तिलोकचंद काबरे विद्यालयातील (Teacher) शिक्षक वासुदेव त्र्यंबक पाटील हे परिवारासह रेणुकानगर येथे वास्तव्यात आहेत. वासुदेव पाटील यांचा दहावीच्या वर्गात शिकत असलेला मुलगा यश (साई) वासुदेव पाटील हा सकाळी आई, वडील व मामा यांच्यासोबत बसला होता. सकाळी दहाच्या सुमारास यश पाटील हा बाथरूममध्ये आंघोळ करण्यासाठी गेला.

यशचा प्रतिसाद नाही

बराच वेळ झाला तरी यश आला नाही. म्हणून त्याचे वडील वासुदेव पाटील यांनी त्यास हाका मारल्या. मात्र काही प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी व यशचे मामा दीपक जयसिंग पाटील यांनी बाथरूमचा दरवाजा तोडला. त्या वेळी यश हा बाथरूममध्ये खाली पडला होता आणि बाथरूममध्ये गॅस गळतीचा वास येत होता. यशला लागलीच हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्यास तपासून मृत झाल्याचे सांगितले. याबाबत दीपक हरसिंग पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील लोहार तपास करीत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com