बिबट्याचा हल्‍ला; हरणानंतर बकरीची शिकार

बिबट्याचा हल्‍ला; हरणानंतर बकरीची शिकार
बिबट्याचा हल्‍ला; हरणानंतर बकरीची शिकार
Leopard Saam Tv

मेहुणबारे (जळगाव) : वरखेडे (ता. चाळीसगाव) या परीसरात बिबट्याने पशुधनाची शिकार करुन अनेकांच्या उरात धडकी भरली आहे. याबरोबरच आता बिबट्या शिकारीसाठी थेट मानवी वस्तीपर्यंत येवून पोहचला तर शिकार मिळत नाही; म्हणून बिबट्याने गावाकडे धाव घेतली. पावसामुळे ट्रॅक्टरच्या ट्राँलीखाली बांधलेल्या बकऱ्यांपैकी एक बकरी उसाच्या फडात फरफटत ओढून नेत शिकार केल्याची घटना आज सोमवारी पहाटे चार ते पाच वाजेच्या दरम्यान वरखेडे खुर्द येथे घडली. चार दिवसांपूर्वीच या भागात बिबट्याने हरणाची शिकार केल्याचे देखील उघडकीस आले आहे. (Jalgaon News Leopard attack Goat hunting after deer)

Leopard
पाणी पिण्यासाठी गेलेल्या चार म्हशींचा मृत्यु; विद्युत तार तुटल्याने पाण्यात करंट

वरखेडे खु. (ता.चाळीसगाव) येथील नाना दौलत तिरमली यांच्याकडे बकऱ्या आहेत. रविवारी पाऊस झाल्याने त्यांनी घरासमोर ट्रॅ्नटरच्या ट्रालीखाली बकऱ्या बांधल्या होत्या. आज पहाटे चार ते पाचच्या दरम्यान बिबट्याने एक बकरी फरफटत नेली. यावेळी (Jalgaon News) ग्रामस्थांना चाहुल लागताच त्यांनी धाव घेतली. ज्या ठिकाणी बकरी फरफटत ऊसाच्या शेतात नेली, तेथपर्यंत ग्रामस्थ गेले. बिबट्याचा पगमार्क मिळून येताच या भीतीने नागरीक माघारी वळले. दिवस उजाडल्यानंतर बिबट्याने ज्या उसाच्या शेतात बकरी ओढून नेली होती; तेथे बकरी मृतावस्थेत आढळून आली.

ग्रामस्थ भयभीत

या प्रकाराने ग्रामस्थ अतिशय भयभीत झाले आहे. रानात, शेतात पदोपदी बिबट्या दर्शन देत असुन पशुहानी देखील मोठ्या प्रमाणावर होत आहे. बिबट्याने आता चक्क मानवी वस्तीपर्यंत पोहचल्याने एकच खळबळ उडाली आहे. आज घरासमोर बांधलेली बकरी बिबट्याने ओढून नेली. एखाद्या व्यक्तीवर हल्ला झाला तर? काय यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहे. वरखेडे शिवारात बिबट्याचा रहिवास असून वनविभागाकडुन काहीच कार्यवाही होत नाही. असा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. बिबट्या आता मानवी वस्तीपर्यंत येवून पोहचल्याने नागरीकांची भीती पसरली असून वन विभागाने या बिबट्याला जेरबंद करावे; अशी मागणी होत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com