
जळगाव : धोबी वराड गावात गुरुवारी (१८ मे) सकाळी दहाच्या सुमारास शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला चढविला. अचानक झालेल्या हल्ल्यात शेतकरी (farmer) भेदरतो. बिबट्या आपल्या जबड्यात मान पकडण्याच्या बेतात असतानाच (Leopard) बिबट्याला ४० वर्षीय शेतकरी ताकदीने झटकून फेकतो. यावेळी आरडाओरड झाल्याने ग्रामस्थ येतात अन् बिबट्या पळ काढतो. (Maharashtra News)
कुटुंब व ग्रामस्थांच्या माहितीनुसार, धोबी वराड (ता. जळगाव) येथील ४० वर्षीय आशिष सुधाकर सुरळकर हे गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे शेतात कामासाठी जात होते. याचवेळी अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. आशिष यांनी वेळीच प्रसंगावधान राखत प्रतिकार करून मान पकडण्याच्या तयारीत असलेल्या बिबट्याला उचलून पटकले. या प्रयत्नात मात्र त्यांच्या चेहऱ्यावर बिबट्याने पंज्याचा वार केला. त्यात त्यांच्या डोळ्याला, कानाला जबर जखम झाली आहे. आजूबाजूचे शेतकरी व मजूर मदतीला धावून आल्याने बिबट्याला पळ काढावा लागला. जखमी आशिष यांना तत्काळ (Jalgaon) जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.
शेतातील गाय फस्त
जखमी आशिष सुरळकर यांच्याकडून रुग्णालयात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती जाणून घेतली. ग्रामस्थांनी सांगितले, की रात्री अकरा ते बाराच्या सुमारास लहू जाधव यांची शेतामध्ये बांधलेली पांढरी गाय याच बिबट्याने फस्त केली असून, महिन्यापूर्वी वासरूही पळवून नेले होते. धोबी वराड गावात बिबट्याची प्रचंड दहशत असून, बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी या वेळी केली.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.