
मेहुणबारे (जळगाव) : वरखेडे (ता.चाळीसगाव) भागात बिबट्या आल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती पसरली आहे. गावाजवळील दोन किमी अंतरावर असलेल्या पळासरे रसत्यालगत गोठ्यात बिबट्याने घुसून वासरी व गोर्याचा फडशा पाडल्याची घटना पहाटे सहाच्या सुमारास उघडकीस आली. त्यामुळे गिरणा पट्ट्यात पुन्हा बिबट्याने (Leopard) डरकाळी फोडल्याने भितीचे वातावरण पसरले आहे. (Jalgaon news leopard terror again chalisgaon aria The calf fell)
वरखेडे येथील शेतकरी (Farmer) पंकज पवार हे आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास शेतात दुध काढण्यासाठी गेले असता त्यांना बिबट्याच्या हल्ल्यात वासरू मृत अवस्थेत दिसले. तर गोऱ्हाचा फडशा पाडुन लोखंडी जाळीतुन उसाच्या शेतात ओढुन नेले होते. पंकज पवार यांनी गोर्याचा शोध घेतला. परंतु गोऱ्हा आढळला नसुन रक्ताचे डाग व काही अवशेष ठीकठिकाणी पडलेले होते. या घटनेची माहिती वन विभागाला दिल्यानंतर घटनास्थळी वनमजुर तानाजी सोनवणे यांनी पहाणी केली. या भागात गेल्या एक ते दोन महिन्यांपासुन बिबट्याचा वावर असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
वेळीच जेरबंद करा अन्यथा..
पाच वर्षापूर्वी 2016 मध्ये गिरणा (Chalisgaon News) पट्ट्यात नरभक्षक बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घालता होता. त्याला शार्प शूटरने गोळ्या घालून ठार केल्यानंतरही गिरणा पट्ट्यातील बिबट्याचे भय संपले नाही. वन विभागाने पिंजरे व ट्रॅप कॅमेरे लावून या बिबट्याचा वेळीच बंदोबस्त करावा अन्यथा 2016ची पुनरावृत्ती होण्याची भिती गिरणा पट्ट्यातील नागरीकांमध्ये आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.