Crime: पन्‍नास रूपयांच्‍या उधारीने गेला जीव

पन्‍नास रूपयांच्‍या उधारीने गेला जीव
Crime: पन्‍नास रूपयांच्‍या उधारीने गेला जीव
deathsaam tv

धरणगाव (जळगाव) : उधारीने दिलेले ५० रूपये घेण्याच्या वादातून पुतण्याने धक्का देत गटारात पडलेल्या काकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील कंडारी येथे घडली. याप्रकरणी धरणगाव पोलिस (Dharangaon Police) ठाण्यात पुतण्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (jalgaon news life was spent on borrowing in fifty rupees)

death
विकास कामांची माहिती घेऊन 'तुतारी एक्सप्रेस' सिंधुदुर्गात

कंडारी येथील भारत सुकडू भिल (वय ४४) असे मयताचे नाव आहे. याबाबत माहिती अशी, की धरणगाव (Dharangaon) तालुक्यातील कंडारी येथे राजू मानसिंग भिल (वय २८) आणि भारत सुकडू भिल (वय ४४) या दोघांमध्ये ५० रुपयांच्या उधारीवरून सोमवारी (ता. ७) रात्री शाब्दिक चकमक सुरू झाली. थोड्याच वेळात शाब्दिक चकमकीचे रूपांतर हाणामारीत (Crime News) झाले.

धक्‍का दिला अन्‌ गेला जीव

हाणामारीत राजूने काका भारत यांना जोराचा धक्का दिला. यात भरत भिल हे बाजूला असलेल्या गटारात जाऊन पडले. (Jalgaon News) गटारात पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला जबर मार बसून मोठा रक्तस्राव झाला. यानंतर भेदरलेला पुतण्या राजूने त्यांना लागलीच नातेवाइकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती भारत भिल यांना मृत घोषित केले. यासंदर्भात पुतण्या राजू भिल याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ हे करीत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com