Jalgaon News: प्रियकरासाठी घर सोडून प्रेयसी आली; लग्‍नाची तयारी सुरू असतानाच आले आई– वडील

प्रियकरासाठी घर सोडून प्रेयसी आली; लग्‍नाची तयारी सुरू असतानाच आले आई– वडील
Jalgaon News
Jalgaon NewsSaam tv

जळगाव : दिंडोली (जि. गुजरात) येथील १९ वर्षीय तरुणीने आपल्या प्रेमासाठी घर सोडून ५ मार्चच्‍या रात्री जळगाव गाठले. जळगावातील प्रियकरासोबत लग्नाची संपूर्ण तयारी होऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करतानाच तिचे पालक (Jalgaon News) जळगावात धडकले अन् एकच धिंगाणा झाला. प्रियकर प्रेयसीला पोलिस ठाण्यात आणून बसविले, पण मुलीने जाण्यास नकार दिल्याने रात्री उशिरापर्यंत गोंधळ सुरू होता. (Maharashtra News)

Jalgaon News
Dhule News: साक्री तालुक्यात गारपिट; शेतात साचला बर्फाचा खच, पिकाचे अतोनात नुकसान

जळगावच्या राहुलचे (काल्पनिक नाव) मामा दिंडोली येथे वास्तव्यास आहेत. राहुल कामासाठी मामाकडे गेला होता. तेथेच त्याचे आरतीसोबत (काल्पनिक नाव) प्रेम जुळले. दोघेही गेल्या तीन वर्षांपासून प्रेमात होते आणि दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.

तरूणीने सोडले घर..

राहुल व अंजली यांच्या प्रेमाला कुटुंबीयांचा विरोध असल्याची खात्री झाल्यावर अंजलीने कोणासही काही न सांगता घर सोडले. काही महिन्यांपूर्वीच राहुल जळगावला परतला होता. रविवारी सकाळी आरतीने रेल्वेने जळगाव गाठले. प्रेयसी जळगावला पोहोचल्यावर प्रियकराने घाई गरबडीत लग्नाची तयारी केली. सोमवारी कुठल्याही मंदिरात लग्न (Marriage) उरकून टाकण्याचा बेत असताना, ऐनवेळेस मुलीचे कुटुंब जळगावला आले.

नोटरी करण्यापूर्वीच धिंगाणा

अंजली आणि राहुल दोघांनी एका वकिलाच्या मदतीने कायदेशीर बाबी समजून घेतल्या. जिल्‍हा व सत्र न्यायालयासमोरच नोटरी करण्यासाठी दोघेही आले असता, नोटरीवर लिखाणाला सुरवात होण्यापूर्वीच मुलीचा भाऊ आणि आई-वडील धडकले. आरतीच्या भावाने तिला ओळखताच एकच धिंगाणा घालून नातेवाइकांनी तिला मारझोड करण्यास सुरवात केली. वेळीच शहर पोलिस पोहोचल्याने प्रकरण पोलिसांत गेले.

मला नाही जायचं वर ठाम

शहर पोलिसांनी अंजली व राहुल यांना पोलिस ठाण्यात आणल्यावर दोघांची स्वतंत्र चौकशी केली. आरती वयाने सज्ञान असल्याने तिने आई-वडीलांसोबत जाण्यास नकार देत प्रियकरासोबत राहण्याचा ठाम निर्णय घेतल्याने हात उगारून धमकावणारे, भीती घालणारे कुटुंब नरमले. मुलीच्या मिन्नत वाऱ्या करायला लागले. मात्र, मुलगी आपल्या निर्णयावर ठाम असल्याने कुटुंबीयांनी हात टेकत गुजरात पोलिसांशी संपर्क केला. गुजरात पोलिस बेपत्ता मुलीसाठी जळगावला येणार असून, रात्री उशिरापर्यंत शहर पोलिसांत या मुलीचे कुटुंब तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com