बंदला गालबोट..भाजप– महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले
भाजप– महाविकास आघाडी

बंदला गालबोट..भाजप– महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले

बंदला गालबोट..भाजप– महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले

जळगाव : महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये वरणगावात महाविकास आघाडी व भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आल्याने दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्‍ये मारामारी झाली. यात अनेकजण जखमी झाले असून जखमी कार्यकर्त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्‍याचे समजत आहे. (jalgaon-news-maharashtra-Bandha-BJP-Mahavikas-Aghadi-activists-clashed-with-each-other-in-varangaon)

महाविकास आघाडीने पुकारलेल्या आजच्या बंदला वरणगाव (ता.भुसावळ) शहरामध्ये गालबोट लागले. महाविकास आघाडी व भाजपचे कार्यकर्ते आमने– सामने आल्‍याने दोन्‍ही पक्षाच्‍या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाली. यानंतर दोन्ही पक्षाचे काही कार्यकर्ते हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्‍याचे समजते.

भाजप– महाविकास आघाडी
काश्मीर घाटीतील पंडितांच्या हत्येचा निषेध

दोन्‍हीकडून आरोप

दोन्ही बाजूने एकमेकांवर मारहाणीचे आरोप केले जात आहे. शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी बंदला समर्थन द्या असं शांततेमध्ये सांगत असताना भाजपाचे कार्यकर्ते आले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केला. वाद झाल्याचे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. तर भाजपचे शहराध्यक्ष सुनील महाडीक यांनी आम्ही व्यापाऱ्यांना दुकान बंद करु नका; असे सांगत शहरामध्ये फिरत असताना अचानक जमावाने आमच्यावर हल्ला केल्याचे सांगितले आहे.

Related Stories

No stories found.