महाराष्‍ट्र बंद..जळगावात महाविकास आघाडीचे नेते उतरले रस्‍त्‍यावर; तरीही प्रतिसाद समिश्र
महाराष्‍ट्र बंद

महाराष्‍ट्र बंद..जळगावात महाविकास आघाडीचे नेते उतरले रस्‍त्‍यावर; तरीही प्रतिसाद समिश्र

महाराष्‍ट्र बंद..जळगावात महाविकास आघाडीचे नेते उतरले रस्‍त्‍यावर; तरीही प्रतिसाद समिश्र

जळगाव : महाराष्ट्र बंद यशस्वी करण्याचे आवाहन करण्यासाठी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते एकवटले असून सर्व नेते रस्‍त्‍यावर उतरले. दुकान चालकांना आवाहन केल्‍यानंतर काहीवेळ दुकाने बंद होती. मात्र नेते मंडळी गेल्‍यानंतर दुकाने सुरू केली. यामुळे नेते रस्‍त्‍यावर उतरल्‍यानंतर देखील बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. (jalgaon-news-Maharashtra-closed-Leaders-of-Maha-Vikas-Aghadi-take-to-the-streets-in-Jalgaon)

उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे शेतकऱ्यांना चिरडल्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. हा बंद यशस्वी करण्यासाठी आज जळगाव शहरात महाविकास आघाडीचे नेते रस्त्यावर उतरले आहेत. टॉवर चौकात कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने एकत्र आले. त्यानंतर फुले मार्केटसह विविध ठिकाणी व्यापाऱ्यांसह दुकानदारांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन महाविकास आघाडीतर्फे करण्यात आले.

महाराष्‍ट्र बंद
शिवसेना, राष्‍ट्रवादीवर कॉंग्रेसची नाराजी

टॉवर चौकापासून मोर्चा

केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. जळगाव येथे ही महाविकास आघाडीच्यावतीने केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शने करत व्यापाऱ्यांना बंद करण्याचे आवाहन महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केले. याप्रसंगी काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील व शिवसेनेचे विष्णू भंगाळे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढून केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.

Related Stories

No stories found.