१८ जुलैपर्यंत राज्यात स्थिर सरकार, पण ठाकरे व शिंदे यांच्यात लढा कायम; ज्योतिषतज्ज्ञांचे भाकित

१८ जुलैपर्यंत राज्यात स्थिर सरकार, पण ठाकरे व शिंदे यांच्यात लढा कायम; ज्योतिषतंज्ञांचे मत
Political News
Political NewsSaam tv

भडगाव (जळगाव) : महाराष्‍ट्र राज्‍यात राजकिय भुकंप झाल्‍याचे पहावयास मिळत आहे. १६ मार्चपासून राज्य सरकारवर अनिष्टता होती. तिचा आता स्फोट झाला. राज्याला स्थिर सरकार १२ ते १८ जुलै दरम्यान लाभेल. मात्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व मंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शेवटपर्यंत लढा राहिल; असे मत प्रख्यात ज्योतिषी तथा बृहन महाराष्ट्र ज्योतीष मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर जकातदार यांनी (Jalgaon News) व्यक्त केले. (jalgaon news maharashtra politics Stable government in the state till July 18)

Political News
Jalna: बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेचा जालन्यात भव्य मोर्चा

महाराष्‍ट्र राज्‍यातील राजकारणात अस्थिरता आली आहे. शिवसेनेत (Shiv Sena) दोन गट पडले असून मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांच्‍यावर शिवसेनेतील मंत्रींनी नाराजी व्‍यक्‍त केली आहे. शिवाय महाविकास आघाडीतून शिवसेनेने बाहेर पडावे; असा आग्रह बंडखोर आमदारांकडून केला जात आहे. यामुळे राज्‍यातील सरकार कधी कोसळेल? हे सांगता येणे सध्‍या तरी कठीण आहे.

दोन जुलैनंतर ठाकरेंसाठी अनुकूल

मंगळ आणि शुक्र एकत्र असल्यामुळे २ जुलैनंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर अविश्वास आल्यास काही प्रमाणात महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) फायद्याचा ठरू शकतो. मात्र येत्या चार दिवसांत अविश्वास प्रस्ताव आल्यास ठाकरे सरकारसाठी ते अवघड ठरेल. शिवाय बंडखोर शिंदे गटासाठी जाणारा प्रत्येक दिवस तापदायक ठरेल, असे नंदकिशोर जकातदार यांनी सध्याच्या ग्रहमान स्थितीनुसार स्पष्ट केले.

तिघांचे ग्रहस्थितीत राजयोग

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची ग्रहमान स्थिती उत्तम आहे. तर शिवसेनेतून बंड केलेले मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ग्रह स्थितीत देखील राजयोग आहे. याशिवाय भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही सध्याची ग्रहमान स्थिती उत्तम असल्याचे नंदकिशोर जकातदार यांनी सांगितले. त्यामुळे या तिघांमध्ये राजयोग प्रत्यक्षात कोणाच्या वाट्याला येतो, हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com