Makar Sankrant: तिळगुळाचा गोडवा महागला

तिळगुळाचा गोडवा महागला
Makar Sankrant
Makar Sankrantsaam tv

जळगाव : कोरोनाच्या लाटेत सण– उत्‍सव विसरलेल्या नागरिकांना नववर्षातील नव्या अपेक्षेप्रमाणे यंदा नव्या वर्षातला मकर संक्रांतीचा सणही महागाईच्या चटक्यात साजरा करावा लागणार आहे. मकर संक्रांतीच्या (makar sankrant) सणाला महागाईची झळ पोहचल्याने संक्रांतीच्या गोडव्यात गोडवा कमी होणार आहे. (jalgaon news makar sankrant til and Jaggery price up market)

Makar Sankrant
St Strike: धुळे विभागात ४७ बस सुरू; ६२५ कर्मचारी दाखल

तिळगूळ घ्या अन् गोड गोड बोला..असे सांगत मकरसंक्रांतीला आप्त, नातलगांना तिळगूळ देऊन तोंड गोड केले जाते. यंदा मात्र हा गोडवा महाग झाला आहे. तिळगुळाच्या (सारखेचा हलवा) दरात किलोमागे वीस रुपयांची वाढ झाल्‍याचे चित्र बाजारात आहे. तिळाची रेवडी ३० ते ५० रुपये पावशेर, तिळाचे लहान लाडू, तिळाची चिक्की पन्नास रुपये पावशेर मिळत आहे.

वाणाच्‍या वस्‍तूही महागल्‍या

मकरसंक्रांतीला महिला हळदीकुकूंवाचे कार्यक्रम घेत महिलांना तिळगूळ देतात. वाण म्हणून काही वस्तूही देतात. यंदा अशा अनेक प्रकारच्या वस्तू दहा रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यंत विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. साखरेचा हलवा २० रुपये पावशेर दराने उपलब्ध आहे. आज (ता.१४) संक्रांत असल्याने नागरिक, महिलांची या वस्तू खरेदीसाठी गर्दी करत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com