गांजाची तस्करी करणाऱ्या तरूणाला अटक; दिड लाखांचा मुद्देमाल जप्त

गांजाची तस्करी करणाऱ्या तरूणाला अटक; दिड लाखांचा मुद्देमाल जप्त
गांजाची तस्करी करणाऱ्या तरूणाला अटक; दिड लाखांचा मुद्देमाल जप्त
CrimeSaam tv

चाळीसगाव (जळगाव) : बेकायदा गांजाची तस्करी करणाऱ्या तरूणाला तालुक्यातील बोरखेडा खु. गावातून पोलिसांनी मंगळवार (ता.१०) मध्यरात्री ताब्यात घेतले. त्याच्या जवळून तीन किलो वजनाच्या गांजासह (Jalgaon News) दिड लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. (jalgaon news man arrested for smuggling marijuana One and a half lakh items confiscated)

Crime
चक्क नखचित्राच्या माध्यमातून साकारली पूर्ण भगवद्गीता

चाळीसगाव- भडगाव रोडवरील बोरखेडा खु. गावातील बस स्थानकाजवळ दुचाकीवरून बेकायदा गांजाची वाहतूक करताना एका तरूणाला ग्रामीण पोलीसांनी रात्री २ वाजता अटक केली आहे. तेजस महादेव खरटमल (वय १९, रा. जुना पावर हाऊस ता. चाळीसगाव) असे अटक केलेल्या तरूणाचा नाव आहे. दरम्यान गुप्त माहिती मिळताच ग्रामीण पोलीसांनी (Police) सदर ठिकाण गाठून हि कारवाई केली. गेल्या महिन्याभरात हि तीसरी कारवाई असल्याने अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांच्या गोठ्यात खळबळ उडाली आहे.

दीड लाखाचा मुद्देमाल जप्‍त

त्याच्या जवळून ४३ हजार ५०० रूपये किंमतीचे २.९०० ग्रॅम वजनाचा गांजा व १ लाख १० हजार रूपये किंमतीची दुचाकी (क्र. एम.एच., १९ डीएस २१७६) असे एकूण १ लाख ५३ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केले आहे. पोना जयंत सपकाळे यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एनडीपीएस ॲक्ट कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रमेश चव्हाण, सपोनि धर्मसिंग सुंदरडे, पोउपनि लोकेश पवार, पोहेकॉ दत्तात्रय महाजन, पोना जयंत सपकाळे आदींनी केली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.