रेल्वेखाली गृहस्थाची आत्महत्‍या; आईच्‍या मृत्‍यूनंतर होते नैराशेत

रेल्वेखाली गृहस्थाची आत्महत्‍या; आईच्‍या मृत्‍यूनंतर होते नैराशेत
रेल्वेखाली गृहस्थाची आत्महत्‍या; आईच्‍या मृत्‍यूनंतर होते नैराशेत

जळगाव : सकाळी घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेलेल्या योगेश रमाकांत वाणी (वय ४७, रा. रथचौक) यांनी रेल्वेखाली आत्महत्या केली. ही घटना असोदा रेल्वेगेटजवळ उघडकीस आली. याप्रकरणी तालुका (Police) पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (jalgaon news man Depression commits suicide under train)

रेल्वेखाली गृहस्थाची आत्महत्‍या; आईच्‍या मृत्‍यूनंतर होते नैराशेत
Shahada: पोलीस बंदोबस्तात मारुती मंदिरात महाआरती, हनुमान चालीसाचे पठण

जळगाव (Jalgaon) शहरातील रथ चौकात रहिवासी योगेश वाणी कुटुंबियांसह वास्तव्यास होते. सराफ कामगार म्हणून काम करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. आज सकाळी घरात त्यांनी घरी पाणी भरले. काही वेळानंतर ते कोणालाही काही न सांगता घरातून बाहेर पडले. यावेळी त्यांनी असोदा रेल्वेगेटजवळील अपलाईनवरील खांबा क्रमांक (४२२/६ ते ८) दरम्यान धावत्या रेल्वेखाली (Suicide) आत्महत्या करीत जीवनयात्रा संपविली. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या खिशात आधारकार्ड आढळून आले. त्यावरुन योगेश वाणी यांची ओळख पटली. त्यानंतर मृतदेहाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात (Jalgaon Medical Collage) दाखल करण्यात आला. त्यांच्या खिशात सुसाईट नोट आढळून आली असून पोलिसांनी ती ताब्यात घेतली आहे. आत्महत्या केल्याचे कळताच त्यांच्या कुटुंबियांसह नातेवाईक व मित्रांनी जिल्हा रुग्णालयात प्रचंड गर्दी केली होती. त्यांनी योगेश वाणी यांचा मृतदेह बघताच मनहेलावणारा आक्रोश केला. त्यांच्या पश्‍चात पत्नी सरला, मुलगी प्रेरणा, मुलगा, मोठे भाऊ, वहिनी, पुतणे, बहिणी, मेव्हणे असा परिवार आहे.

आई गेल्याने नैराश्यात

दोन वर्षांपुर्वी योगेश वाणी यांच्या आईचे हृदविकाराच्या झटक्याने निधन झाले. आईच्या अकाली जाण्याने योगेश हे नैराश्यात होते. त्यांचे अनेकदा कामात देखील मन लागत नसल्याने त्यांनी नैराश्यातूनच आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलेले असावे; अशी माहिती त्यांचे भाऊ संदेश वाणी यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com