आईने दार उघडताच दिसला मुलाचा मृतदेह

आईने दार उघडताच दिसला मुलाचा मृतदेह
आईने दार उघडताच दिसला मुलाचा मृतदेह
Suicide CaseSaam tv

जळगाव : हरिविठ्ठलनगरातील धनगरवाड्यात कौटुंबीक कलहातून एकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. गणेश बडगुजर असे मयताचे नाव असून रामानंदनगर पोलिसांत (Police) याप्रकरणी अकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (jalgaon news man suicide at home mother opened the door and show body)

Suicide Case
अस्मानी संकट..रावेर तालुक्यावर तिसऱ्यांदा वादळी पावसाचा तडाखा

शहरातील हरिविठ्ठलनगरातील (Jalgaon News) धनगर वाड्यात गणेश आत्माराम बडगुजर (वय ४८) कुटूंबीयांसह वास्त्यास आहेत. ते इंडिया गॅरेज येथे कामाला होते. गणेश बडगुजर यांच्या लहान मुलीचे लग्न झाल्यानंतर साधारणत: दोन महिन्यापासून कुटुंबात कटकटी सुरु झाल्या होत्या. पती-पत्नीच्या वाद वाढायला नको म्हणून पत्नी प्रतिभा बडगुजर कंटाळून मोठ्या मुलीकडे रहायला गेल्या होत्या. तिथून त्या जैन इरिगेशन येथे कामाला जात होत्या. त्या मोठ्या मुलीसोबत घरी आल्या होत्या. गणेश यांच्यासह बहीण व आई घरीच होते. यावेळी पुन्हा वाद निर्माण होउन भांडणाला सुरवात झाली. गल्लीतील लोकांनी बडगुजर दाम्पत्यास समजविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मात्र, पत्नी व मोठी मुलगी १० वाजता घरातून निघून गेली. या पाठोपाठ मृताची आई व बहिण ही घरातून बाहेर गेल्याने घरात कोणीही नसताना गणेश यांनी (Suicide) गळफास घेतल्याची घटना घडली.

आईचा आक्रोश

बहिणीला सोडून आल्यानंतर मृताची आईने दार उघडताच घरात छोट्याशा दोरीने मुलगा गणेश याने गळफास घेतल्याचा अवस्थेत दिसला, यावेळी आईने एकच आक्रोश केला. शेजाऱ्यांसह गल्लीतील रहिवासी मदतीला धावून आल्यावर त्यांनी रामानंदनगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. गणेश बडगुजर यांच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन मुली आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com