महादेवाच्‍या मंदिरातील घंटा व तांब्‍याच्‍या कलशाची चोरी

महादेवाच्‍या मंदिरातील घंटा व तांब्‍याच्‍या कलशाची चोरी
Theft
TheftSaam tv

मेहुणबारे (जळगाव) : व्यसन भागवण्यासाठी किंवा मौज मस्ती करण्यासाठी खिशात पैसे नसले तर चोर कुठल्या थराला जातील याचा नेम नाही. भऊर (ता. चाळीसगाव) शिवारातील गिरणाकाठावर असलेल्या महादेवाच्या मंदिरातील 15 ते 20 किलो वजनाचा घंटा व तांब्याचा कलश चोरून नेल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. (jalgaon news mehunbare Theft of bells and copper urns in Mahadev temple)

भऊर येथे गिरणा काठी जुने शिवमंदिर आहे. या (Jalgaon News) ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणावर नियमीत दर्शनासाठी जात असतात. आज सकाळी शामा मासरे हे देव दर्शनासाठी मंदिरात गेले असता त्यांना मंदिरात वाजवायची घंटा व तांब्याची घागर दिसून आली नाही. सुमारे 15 ते 20 किलो वजनाचा घंटा व घागर असा 20 ते 22 हजार रूपयांचा ऐवज रात्रीतून कोणीतरी अज्ञात चोरट्याने (Theft) मंदिरातून चोरून नेल्याचे उघडकीस आले. या चोरीची माहिती मेहूणबारे पोलीसांना दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. चोरट्याने चक्क मंदिरातील घंटा चोरून नेल्याने भाविकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com