Jalgaon: एकाच दिवसात पारा ६ अंशांनी घसरला

एकाच दिवसात पारा ६ अंशांनी घसरला
Temperature
Temperaturesaam tv

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ झाली होती. मात्र, वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होऊन थंडीचे पुनरागमन झाले आहे. रविवारी १५ अंशांवर असलेला पारा (Jalgaon Temperature) सोमवारी ९ अंशांपर्यंत खाली आला. (jalgaon news Mercury dropped by 6 degrees in one day)

Temperature
Corona Update: चाचण्या घटल्याने रुग्णसंख्या कमी; जळगाव जिल्ह्यात नवे ८० बाधित

मागील महिन्‍यात अर्थात डिसेंबरच्‍या पहिल्‍या आठवड्यात थंडी चांगलीच वाढली होती. दोन आठवडे थंडीचा जोर कायम राहिला. यानंतर मात्र थंडी काहीशी कमी झाली. गेल्‍या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे पारा १५ अंशापर्यंत वर आलेला होता. यामुळे गरमी जाणवत होती.

गारपीट झाल्‍याने गारठा वाढला

तीन दिवसांपुर्वी शिरपूर (Shirpur), शिंदखेडा परिसरात गारपीटसह जोरदार पाऊस झाला. तर जळगाव (Jalgaon) जिल्‍ह्यातील अनेक भागात पाऊस पडला. यामुळे कमी झालेली थंडी पुन्‍हा वाढली. यात रविवारी १५ अंश सेल्‍सीअस इतके तापमान असताना यात एकाच दिवसात पारा ६ अंशांची घट झाल्यामुळे वातावरणात चांगलाच गारठा निर्माण झाला आहे.

मागील पाच दिवसांचे तापमान

१० जानेवारी ९ अंश

९ जानेवारी १५ अंश

८ जानेवारी १४ अंश

७ जानेवारी १३ अंश

६ जानेवारी १४ अंश

५ जानेवारी १४ अंश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com