घरगुती वीजपुरवठा अचानक खंडित करू नका : पालकमंत्री गुलाबराव पाटील

थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली असून, धरणगावची मागील वर्षी असलेली १० लाखांची थकबाकी यावर्षी सव्वाकोटी रुपयांपर्यंत गेली असल्याचे सांगितले.
घरगुती वीजपुरवठा अचानक खंडित करू नका : पालकमंत्री गुलाबराव पाटील
गुलाबराव पाटीलगुलाबराव पाटील

धरणगाव (जळगाव) : गेल्या काही दिवसांपासून महावितरणने ग्राहकांचा वीजपुरवठा कोणतीही पूर्वसूचना न देता कापण्याचा धडाका लावला आहे. मात्र, कोरोनाच्या संकट काळात सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी धरणगाव येथे अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन कोणत्याही ग्राहकाचा वीजपुरवठा अचानक खंडित करू नका, अशा सूचना दिल्या. (jalgaon-news-minister-gulabrao-patil-meet-mahavitara-and-connection-not-cut-house)

धरणगाव येथे झालेल्‍या बैठकीस लोकसभा सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष पी. एम. पाटील, नगराध्यक्ष नीलेश चौधरी, शहराध्यक्ष राजेंद्र महाजन, नगरपालिकेचे नगरसेवक, कार्यकर्ते पदाधिकारी तसेच वीज विभागाचे कार्यकारी अभियंता आर. एस. पवार, सहाय्यक कार्यकारी अभियंता एस. जी. रेवतकर व धरणगाव अर्बन युनिटचे कनिष्ठ अभियंता एम. बी. धोटे उपस्थित होते. या वेळी कोणत्याही ग्राहकाचे वीज जोडणी अचानक कापू नका, असे आदेश गुलाबराव पाटील यांनी दिले.

धरणगाव तालुक्‍याची थकबाकी सव्‍वा कोटी

वीज विभागाचे अधिकारी, कर्मचारी घरगुती व व्यापाऱ्यांच्या वीज जोडण्या तोडत आहेत. यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे सांगून पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. याप्रसंगी वीज विभागाचे कार्यकारी अभियंता आर. एस. पवार यांनी थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली असून, धरणगावची मागील वर्षी असलेली १० लाखांची थकबाकी यावर्षी सव्वाकोटी रुपयांपर्यंत गेली असल्याचे सांगितले.

गुलाबराव पाटील
भावी पतीदेखत मुलीला नेले पळवून; एकतर्फी प्रेमातून प्रेमविरासह कुटुंबियांचा प्रताप

तीन टप्‍प्‍यात बिल वसुलीचे आदेश

पालकमंत्री पाटील यांनी बिल भरण्यासाठी ग्राहकाला संधी द्या, तीन टप्प्यात अर्थात ४० : ३० : ३० याप्रमाणे टप्पे करून बिलाची वसुली करावी, तसेच धरणगाव पाणीपुरवठ्याचा एक्स्प्रेस फिडर असून, तेथे नेहमी वीजपुरवठा खंडित होत असतो. त्यामुळे गावातील पाणीपुरवठा उशिराने होत असतो. या ठिकाणीचा वीजपुरवठा खंडित होता कामा नये, असे आदेश अधिकाऱ्यांना दिले.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com