‘एमपीएससी’ परीक्षा : ताप आलेल्‍यांसाठी स्‍वतंत्र व्‍यवस्‍था

‘एमपीएससी’ परीक्षा : ताप आलेल्‍यांसाठी स्‍वतंत्र व्‍यवस्‍था
‘एमपीएससी’ परीक्षा : ताप आलेल्‍यांसाठी स्‍वतंत्र व्‍यवस्‍था
एमपीएससी

जळगाव : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ‘ब’ संयुक्त पूर्वपरीक्षा २०२० उद्या (ता. ४) होणार आहे. सकाळी ११ ते १२ या वेळेत शहरातील ३५ उपकेंद्रांवर होणाऱ्या परीक्षेसाठी जिल्ह्यातून ११ हजार ४६३ परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षा घेण्यासाठी एक हजार १३० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. परीक्षार्थींना परीक्षेसाठी विहित उपकेंद्रावर परीक्षा सुरू होण्यापूर्वी दीड तास अगोदर हजर राहणे अनिवार्य आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी दिली. (jalgaon-news-MPSC-Examination-Independent-center-system-for-fever-patients)

परीक्षार्थीने परीक्षेचे प्रवेश प्रमाणपत्र (डाउनलोड करून प्रिंट केलेले) आणणे सक्तीचे आहे. विषयांकित परीक्षा यापूर्वी रविवार ११ एप्रिलला घेण्याचे नियोजित होते. त्यानुसार उमेदवारांना प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध करून दिली होती. तथापि, प्रवेश प्रमाणपत्र प्रस्तावित शनिवारी होणाऱ्या परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.

ताप असलेल्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था

ताप, खोकला, थंडी आदी लक्षणे असलेल्या अथवा ३८ डिग्री सेल्सिअस अथवा १००.४ डिग्री फॅरेनहाइटपेक्षा जास्त तापमान असलेल्या परीर्क्षीची बैठकव्यवस्था स्वतंत्र करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेसाठी नियुक्त सर्व अधिकारी, कर्मचारी व उमेदवारांनी आरोग्यसेतू ॲप डाउनलोड करावे.

एमपीएससी
तिसऱ्या लाटेचा धोका..जिल्हा रुग्णालयात कोरोना नियमाकडे पाठ

हे आहेत नियम

- परीक्षार्थींची थर्मल गनद्वारे तापमान तपासणी

- परीक्षार्थीला ओळखीचा पुरावा आवश्‍यक

- स्मार्ट व डिजिटल वॉच, मायक्रोफोन, मोबाईलला बंदी

- पुस्तके, बॅग्स, पॅड, पाऊच, कॅल्क्युलेटर वापरास बंदी

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com