
जळगाव : महावितरणच्या जळगाव परिमंडलात गेल्या वर्षभरात वीजचोरीची ११ हजार ७९४ प्रकरणे उघडकीस (Jalgaon News) आली आहेत. यात ग्राहकांनी २३ कोटी ९ लाख रुपयांची वीजचोरी (Electricity Theft) केल्याचे आढळून आले आहे. या सर्वांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ८८ प्रकरणांत वीजचोरी करणाऱ्यांवर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Latest Marathi News)
महावितरणतर्फे जळगाव, धुळे व नंदूरबार जिल्ह्यात सातत्याने वीजचोरी विरोधात मोहीम राबवण्यात येत आहे. यात आकडा टाकून वीजचोरी करणाऱ्यांसह मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात येत आहे. जळगाव परिमंडलात एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या आर्थिक वर्षात मोठ्या संख्येने वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली. यात जळगाव मंडलात ८ हजार १९६, धुळे मंडलात २ हजार १४७ तर नंदुरबार मंडलात वीजचोरीची १ हजार ४५१ प्रकरणे उघडकीस आली.
८ कोटीचा दंड वसूल
वीजचोरी केलेल्या ११ हजार ७९४ प्रकरणांत ग्राहकांना २३ कोटी ९ लाख रुपयांच्या वीजचोरीची बिले देण्यात आली. यातील ३४२५ ग्राहकांकडून वीजचोरीच्या बिलांची ८ कोटी ६५ लाख रुपयांची रक्कम महावितरणने वसूल केली आहे. ज्या ग्राहकांनी वीजचोरीची बिले भरलेली नाही; त्यांच्यावर पोलिसांत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया महावितरणतर्फे सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत जळगाव मंडलात १७, धुळे मंडलात ६१ तर नंदुरबार मंडलात १० प्रकरणांत वीजचोरांवर पोलिस ठाण्यांत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. वीजचोरी विरोधातील धडक मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे. नागरिकांनी अधिकृत जोडणी घेऊनच विजेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.