आठ दिवसात काढले ५१ हजार आकडे; वीजचोरी विरोधात महावितरणची धडक मोहीम

आठ दिवसात काढले ५१ हजार आकडे; वीजचोरी विरोधात महावितरणची धडक मोहीम
आठ दिवसात काढले ५१ हजार आकडे; वीजचोरी विरोधात महावितरणची धडक मोहीम
MahavitaranSaam tv

जळगाव : वाढत्या उन्हाची तीव्रता व कोरोना काळानंतर उद्योग जगताकडून वाढलेली वीज मागणी यामुळे महावितरणची सध्याची उच्चतम मागणी २४ हजार ते २४ हजार ५०० मेगावॅटपर्यंत गेली आहे. कोळशाच्या कमतरतेमुळे वीजनिर्मितीत घट झालेली आहे. या पार्श्वभूमीवर अतिभारीत वीज (MSEDCL) वाहिन्यांवरील रोहित्रांकडे विशेष लक्ष देऊन त्या रोहित्रांची क्षमता व त्याच्यावरील वीजभार तपासण्याची मोहीम २१ एप्रिलपासून राज्यभर राबविण्यात आली. या मोहिमेत वीजतारांवरील ५१ हजार ५९७ आकडे काढण्यात आले. (jalgaon news MSEDCL campaign against power theft inmaharashtra)

Mahavitaran
आत्महत्येचे स्टेटस ठेवले अन्‌ युवकाने संपविले जीवन

महावितरणने २१ एप्रिल ते २८ एप्रिल या आठ दिवसांत अनधिकृत वीजवापरासाठी वीजतारांवर टाकलेले ५१ हजार ५९७ आकडे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी काढले आहेत. वीजचोरीसाठी वापरण्यात आलेले सर्व्हिस वायर, केबल, स्टार्टर आदी साहित्यही जप्त केले आहे. या मोहिमेत औरंगाबाद परिमंडलात ४ हजार ९६७, लातूर परिमंडलात ३ हजार ८४८, नांदेड परिमंडलात ९ हजार ३०, कल्याण परिमंडलात ४ हजार १७८, भांडूप परिमंडलात ३३, नाशिक परिमंडलात ९ हजार ३१६, जळगाव परिमंडलात ४ हजार ७९०, नागपूर (Nagpur) परिमंडलात २२१, अमरावती परिमंडलात १ हजार २००, चंद्रपूर परिमंडलात २९७, गोंदिया परिमंडलात ७१७, अकोला परिमंडलात १ हजार ८९७, बारामती परिमंडलात ८ हजार ९१९, पुणे परिमंडलात ९२३ तर कोल्हापूर परिमंडलात १ हजार २६१ आकडे काढण्यात आले.

१९२ मेगावॅटचा भार कमी

या मोहिमेमुळे वीज यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे. राज्यभर २ हजार ४८५ वीजवाहिन्यांवरील जवळपास १९२ मेगावॅट वीजभार कमी झाला आहे. तसेच या मोहिमेमुळे अनावश्यकपणे वाढणारी विजेची मागणी देखील कमी होऊन भारनियमनाची तीव्रताही कमी झाली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.