Jalgaon: वीजबिल वसुलीतूनच होणार यंत्रणा सक्षम!

वीजबिल वसुलीतूनच होणार यंत्रणा सक्षम!
Mahavitaran
MahavitaranSaam tv

जळगाव : शेतकऱ्यांकडे असलेल्‍या थकित बिलाची वसुलीसाठी महाकृषी ऊर्जा अभियान राबविले. यात थकीत वीजबिलातून वसूल झालेल्या ६६ टक्के कृषी आकस्मिक निधीचा वापर विद्युत यंत्रणा सक्षम करण्यासाठी होत आहे. याच अभियानामुळे (Jalgaon) जळगाव जिल्‍ह्यात पाच नवीन उपकेंद्र मंजूर झाले आहेत. अर्थात थकबाकी वसुलीतून त्‍याचाच फायदा (Farmer) बळीराजाला केला जात आहे. (Jalgaon News MSEDCL Bill Recovery)

Mahavitaran
Dhule Rain: जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस; शेतात साचले गुडघाभर पाणी

महाकृषी ऊर्जा अभियानात कृषिपंप (MSEDCL) वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी पहिल्या वर्षात बिले भरणाऱ्यांना निर्लेखन, व्याज व विलंब आकारात भरघोस अशी ६६ टक्के सूट देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील कृषिपंप ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद देत वीजबिले भरली. जमा झालेल्या वीजबिलातून ३३ टक्के रक्कम ग्रामपंचायतींतर्गत व ३३ टक्के रक्कम जिल्हांतर्गत कृषी आकस्मिक निधी म्हणून वापरली जात आहे. या निधीतून नवीन वीजजोडण्या देण्यासोबतच विजेच्या पायाभूत सुविधा सक्षम करण्याची कामे केली जात आहेत.

पाच नवीन उपकेंद्र

कृषी आकस्मिक निधीतून जळगाव जिल्ह्याला पाच नवीन उपकेंद्र मिळाले आहेत. यात चिंचोली (ता. जळगाव), चिंचाटी (ता. रावेर), हिंगणे (ता. बोदवड), सारबेटे (ता. अमळनेर) व शेळावे (ता. पारोळा) या पाच ठिकाणी ३३ केव्ही क्षमतेची उपकेंद्रे मंजूर झाली आहेत. त्यासाठी जवळपास १८ कोटींहून अधिक निधी लागणार आहे. चिंचोली व चिंचाटी उपकेंद्रांचे भूमिपूजनही झाले आहे, तर उर्वरित उपकेंद्रांची निविदा प्रक्रिया सुरू आहे. त्यासह कोळगाव (ता. भडगाव), पिंपळगाव हरेश्वर (ता. पाचोरा) व गौलखेडे (ता. रावेर) या तीन उपकेंद्रांची सुमारे ३.३२ कोटी रुपये खर्चून क्षमतावाढ केली जात आहे.

ब्रेकडाउन झाले कमी

या निधीतून दोन ३३ केव्ही लिंक लाईनचे काम पूर्ण झाले आहे, तर ३३ केव्ही लोण (ता. भडगाव) व ३३ अंतुर्ली (ता. मुक्ताईनगर) या उपकेंद्रांच्या लिंक लाईनचे काम झाल्याने या उपकेंद्रांवरील ओव्हरलोडिंगची समस्या सुटली आहे. तसेच या लाईनवरील ब्रेकडाउनही कमी झाले आहे. यामुळे कृषिपंपांसह इतर ग्राहकांना चांगल्या दाबाने सुरळीत वीजपुरवठा होत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com