भावजायीला पाटावर बसवत नणंदांनी ओवाळले; माहेरी आल्‍यावर अनोखी भाऊबीज

भावजायीला पाटावर बसवत नणंदांनी ओवाळले; माहेरी आल्‍यावर अनोखी भाऊबीज
भावजायीला पाटावर बसवत नणंदांनी ओवाळले; माहेरी आल्‍यावर अनोखी भाऊबीज
भाऊबीज

रावेर (जळगाव) : भावाच्या अकाली निधनानंतर भावजयीने समर्थपणे संसार करून तिच्या मुलाचे शिक्षण पूर्ण केले. इतकेच नव्हे तर सासू सासऱ्यांना मुलाची आणि नणंदांना देखील भावाची उणीव भासू दिली नाही. म्हणून दिवाळीला माहेरी आलेल्‍या नणंदांनी भावजयीला ओवाळल्याची हृदयस्पर्शी तितकीच आदर्श घटना तालुक्यातील शिंदखेडा येथे घडली. (jalgaon-news-Nandan-waved-to-his-brother-in-law-bhaubij-celebretion)

भाऊबीज
बालिकेच्‍या अंथरूणात दोन साप..गळ्यावर दंश केल्‍याने काही क्षणात मृत्‍यू

शिंदखेडा येथील अंगणवाडीमध्ये सेविका म्हणून काम करणाऱ्या मीनाक्षी रवींद्र पाटील यांची ही संघर्ष गाथा आहे. डॉ. रवींद्र यांच्याशी विवाहानंतर त्यांना मुलगा झाला. पण पतीचे सप्टेंबर १९९२ मध्ये आकस्मिक निधन झाले. त्यावेळी त्यांचा मुलगा फक्त ४ महिन्यांचा होता. मीनाक्षी पाटील यांना धक्का बसला. पण मुलासाठी त्या सावरल्या. ऑक्टोबर १९९२ मध्ये त्यांनी शिंदखेडा गावातच अंगणवाडीमध्ये नोकरीसाठी अर्ज केला. त्यांची निवड झाली. मीनाक्षी यांचा मुलगाही आता इंजिनीअर झाला असून पुणे येथे नोकरी करीत आहे.

दिराचे लग्‍नही दिले लावून

नोकरी करत करत त्यांनी मुलाचे शिक्षण केले, दिराचा सांभाळ व विवाह केला. त्यांची एक नणंद रजनी यांचे सासर तालुक्यातील कोचूर आहे. तर दुसऱ्या नणंद जयश्री यांचे सासरही वाघाडी येथे आहे. भावजयीने भावाच्या निधनानंतर ही सावरलेला संसाराचा गाडा पाहून आणि त्यांनी नणंदांचेही माहेरपण नीटनेटके केले. त्यांना भावाची उणीव भासू दिली नाही.

लहान भावासोबत भावजयीला बसविले पाटावर

लहान दिराचा सांभाळ केला, तसेच सासू सासरे यांची सेवा केली; हे पाहून नणंद जयश्री यांना त्यांचे मोठे कौतुक आणि अभिमान वाटत असे. त्यांच्या मनात भावजयीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा विचार आला. त्यांनी दिवाळीनंतर मोठ्या बहिणीला रजनी यांना माहेरी शिंदखेडला बोलावले. दोघा बहिणींनी लहान भावास ओवाळलेच पण मोठा भाऊ हयात नसतांना त्याच्या पत्नीला अर्थात भावजयीलाच पाटावर बसवून ओवाळले आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. यातून श्रीमती मीनाक्षी यांचे कार्य अधोरेखित झालेच पण नणंद जयश्री यांच्या मनाचा मोठेपणा आणि पुरोगामी विचारही दिसून आला. यावेळी मीनाक्षी पाटील यांना आनंदाश्रू आवरता आले नाहीत.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com