नशिराबाद नगरपरिषदेच्या सदस्य संख्येबाबत २० ला निर्णय

नशिराबाद नगरपरिषदेच्या सदस्य संख्येबाबत २० ला निर्णय
नशिराबाद नगरपरिषदेच्या सदस्य संख्येबाबत २० ला निर्णय

जळगाव : येथून जवळच असलेल्या नवनिर्वाचित नशिराबाद नगरपरिषदेच्या सदस्य संख्येबाबत २० जुलैला जिल्हाधिकारी अभिजित राऊत निर्णय घेणार आहेत. याबाबत ते नगररचना विभागाला कळविणार आहेत. गेल्या १ जुलैला नशिराबाद ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपरिषदेत झाले. नंतर तहसीलदार नामदेवराव पाटील यांनी प्रशासक म्हणून सूत्रे होती घेतली आहेत. (jalgaon-news-Nasirabad-Municipal-Council-Decision-on-number-of-members)

नगरपरिषद झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा नवा आकृतिबंध तयार करावा लागेल. सध्या ग्रामंपचायतीत ६० कर्मचारी आहेत. आता नगरपरिषद झाल्यानंतर किती पदे तयार करावी लागतील, याबाबत अभ्यास सुरू आहे. सध्या नशिराबादची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार २६ हजार आहे. २०२१ ची जनगणना झालेली नाही, अन्यथा या गावाची लोकसंख्या ३५ हजारांवर आहे. असे असल्याने सदस्य संख्या किती ठेवावी, याबाबत जिल्हाधिकारी निर्णय घेणार आहेत. लोकसंख्येच्या आधारावर हे गणित असते.

नशिराबाद नगरपरिषदेच्या सदस्य संख्येबाबत २० ला निर्णय
पुस्‍तकातील अभ्‍यास भिंतीवर; ध्येयवेड्या शिक्षकांनी भिंती केल्या बोलक्या

शासनाकडून घ्यावी लागणार मंजूरी

नगरपरिषद झाल्यानंतर मुख्याधिकारी, इतर विविध विभागप्रमुख, लिपिक, शिपाई आदींची महत्त्वाच्या पदांचा आकृतिबंध तयार करावा लागेल. तो शासनाकडे पाठवून त्याला मंजुरी घ्यावी लागेल. सोबतच लोकप्रतिनिधी किती असावेत यावरही अहवाल तयार केला जाईल. येत्या २० जुलैला सदस्य संख्या ठरेल. प्रशासक नेमल्यानंतर गावातील पाणीपुरवठा, आरोग्य, पथदीप या बाबींवर लक्ष केंद्रीत असल्याचे प्रशासक तथा तहसीलदार पाटील यांनी सांगितले.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com