भोंगे प्रकरणावरून कोणाचे पोट भरले नाही; खडसेंची राज ठाकरेंवर टिका

भोंगे प्रकरणावरून कोणाचे पोट भरले नाही; खडसेंची राज ठाकरेंवर टिका
Eknath Khadse
Eknath KhadseSaam tv

जळगाव : सकाळची अजान बंद झाली तशी सकाळी मंदिरात होणारी आरतीही बंद करावी लागली असल्याने वारकरी संप्रदायात नाराजी पसरली आहे. भोंगे प्रकरणावरून कोणाचे पोट भरले नाही. मात्र लक्ष विचलित करण्यासाठी हे सर्व केले जात असल्याची टीका ही माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केली आहे. (jalgaon news ncp meet amalner eknath khadse target raj thackeray)

Eknath Khadse
घरात किरकोळ वाद; विवाहितेची आत्‍महत्‍या

अमळनेर (Amalner) येथे झालेल्‍या राष्ट्रवादी (NCP) कार्यकर्ता संवाद यात्रेनिमित्त आयोजित सभेत एकनाथ खडसे यांनी भाजप आणि राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. गेल्या काही दिवसांपासून मशिदीवरून भोंगे खाली उतरवण्यासाठी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी जे आंदोलन सुरू केले; त्यात मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी गेले आणि मंदिरावर असलेले भोंगे ही उतरावण्याची वेळ आली आहे.

महागाईने जनता त्रस्‍त, परंतु कोणीही बोलत नाही

यावेळी बोलताना एकनाथ खडसे यांनी म्हटले, की महागाईमुळे जनता त्रस्त असताना या विषयावरून लक्ष इतरत्र हलविण्यासाठी विरोधी पक्ष नेते विविध नवे विषय उकरून काढत आहेत. त्यात माध्यमांचा विचार केला; तर गेल्या महिन्या भरापासून कधी ॲड. सदावर्ते परिवार, कधी राना दाम्पत्य सुरू होते. त्यात आता राज ठाकरे यांच्या भोंगा विषयावर दिवस रात्र बातम्या सुरू आहेत. मात्र एकही विरोधी पक्षातील नेता अथवा टिव्ही चॅनल हे महागाई विरोधात बोलताना दिसत नाही. जसे राज्यात दुसरे विषय नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com